प्रतिनिधी: संकेश यादव

मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी पुणे शहरातील मोक्का, खुन खुनाचा प्रयत्न या गुन्हयातील पाहिजे व फरार आरोपींना अटक करणेसाठी आदेशित केलेले होते. प्राप्त आदेशाप्रमाणे युनिट-५ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक, महेश बोळकोटगी च मा. वरिष्ठांचे आदेशान्वये कार्यवाही करणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले.

युनिट-५ गुन्हे शाखेकडील पोउपनि लोहोटे व तपास टिन युनिट कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, राजस शेख व पृथ्वीराज पांडुळे यांना त्यांचे बातमीदारां मार्फतीने बातमी मिळाली की कोंढवा पोलीस ठाणेकडील मकोका सारख्या गुन्हयातील आरोपी नामे साहिल कचरावत हा महमंदवाडी वनीकरण जंगलात, तरवडेवस्ती, कोंढवा येथे लपुन बसलेला आहे.

नमुद बातमीप्रमाणे पोलीस निरीक्षक, महेश चोळकोटगी, युनिट -०५, गुन्हे शाखा, पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली युनिटकडील पथक हे वाहनाने बातमीच्या ठिकाणी वनीकरण जंगलात जाऊन शोध घेतला असता स्टाफ ओळखत असलेला व पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार साहिल कचरावत हा एका झाडाच्या बुंध्या जवळ बसलेला दिसला. त्यावेळी नमुद इसमाची व पोलीसांची नजरानजर होताच तो उठून पळु लागला तेव्हा पोलीसांनी साहिल अर्जुन कचरावत, वय २२ वर्षे, रा. स.नं. ६८, सातवनगर, होंडवाडी रोड, कंजारभट वस्ती, हडपसर, पुणे याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. तो कोंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.८०२/२०२२, भा.दं.वि. कलम ३८६,५०४, ५०६ (२), आर्म अॅक्ट ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३), १३५,१४२,महाराष्ट्र क्रिमीनल अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९चे कलम ३ (१) (1)३ (२), ३(३) ३ (४) या गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याने त्याची वैद्यकिय तपासणी करुन मा. सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे याचे ताब्यात दिलेले आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त, श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री महेश बोळकोटगी, स.पो.नि. कृष्णा बाबर, पो.उप.नि. अविनाश लोहोटे, चैताली गपाट, पोलीस अंमलदार, राजस शेख, प्रमोद टिळेकर, दया शेगर, पृथ्वीराज पांडुळे, दाऊद सय्यद, विनोद शिवले, अकबरशेख, विलास खंदारे यांनी केलेली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!