प्रतिनिधी: संकेश यादव

मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, मा. विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) मुंबई, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण- १ ), गुन्हे शाखा, गुअवि, मुंबई यांनी अवैध अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने कक्षाकडुन अवैध अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांविषयी माहिती प्राप्त करून कारवाई सुरू करण्यात आली होती…

दिनांक २२/०७/२०२३ रोजी कक्ष-८ चे प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून, एक इसम अग्नीशस्त्रासह अंधेरी पूर्व परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी मॅकडोनाल्ड उपहागृह, अंधेरी स्टेशन जवळ, अंधेरी पूर्व मुंबई येथे सापळा रचुन सदर इसमास कोणताही घातपात करण्याची व पळुन जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेतले. सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडती मध्ये एक देशी बनावटीची पिस्टूल मॅगझिनसह व दोन जिवंत काडतुसे मिळुन आले. सदरचे अग्निशस्त्र हे अवैधरित्या बाळगल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये निदर्शनास आले आहे.

सदर इसमाविरुध्द अंधेरी पोलीस ठाणेस वि.स्था. गु.र.क्र. ३८०/२०२३ कलम ३, २५ भा. ह. का. सह ३७ (१) (अ) १३५ मपोका अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास कक्ष-८, गुन्हे शाखा, मुंबई हे करीत आहेत.

सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शशीकुमार मीना, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण- १) श्री. राज तिलक रौशन, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त डी (प) श्री. महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-८ चे प्रपोनि. लक्ष्मीकांत साळुंखे, सपोनि. मधुकर धुतराज, सपोनि मनोजकुमार प्रजापती, पोहक. ३०४०७ / शिरसाट, पोहक्र. ९६१२४८ / यादव, पोहक्र.०४५४३/ सावंत, पोहक्र.०४१२७६ / कांबळे, पोशिक्र. ०८९७१/रहेरे, पोशिक्र. ०९१५६३/ सटाले, पोशिचाक्र. १४१०८७/सुतार यांनी पार पाडली आहे.

गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-८, अंधेरी पूर्व, मुंबई यांनी बेकायदेशीर अग्नीशस्त्रे कब्जात बाळगणाऱ्या इसमास जेरबंद केलेबाबत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!