प्रतिनिधी,

येरवडा : टँकर व्यावसायिकाला ३० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोन पत्रकारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी विलास गुलाबराव देशमुख (वय ६४, रा. वडगावशेरी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उदय पोवार (वय ४०, रा. लोहगाव) आणि शब्बीर शेख (वय ३९, रा. विश्रांतवाडी) अशी गुन्हा झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशमुख यांचा टॅंकरद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय आहे. पोवार आणि शेख या दोघांनी देशमुख यांच्याकडे ३० हजार रुपयांची मागणी केल्याने त्यांनी पैसे दिले.मात्र त्यांनी पुन्हा पैशांची मागणी केली. देशमुख यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर शेखने टॅंकरचालक संजय मुधोळकर यांना फोन करून टॅंकरचा व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिली. याबाबत देशमुख यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!