प्रतिनिधी,

जे. एम. डी. फास्ट फुड हॉटेल, आर्य नगर / ३२, बजाज फिनस समोर, विमाननगर, पुणे या ठिकाणी अखिल ऊर्फ ब्रिटीश पालांडे (टोळी प्रमुख), ओंकार शिवाजी टिंगरे, वय २२ वर्षे रा.संगमवाडी पुणे (टोळी सदस्य) व आयुष जाधव अंदाजे वय २५ वर्षे (टोळी सदस्य) हे दुचाकी वरून येवुन, फिर्यादीस मला प्रत्येक महिन्याला ५०००/- रुपये दयायचे म्हणुन सांगितले होते ना मग का नाही दिले तुम्हाला माहित आहे ना. मी इथला किती मोठा गुड आहे. आताच्या आता ५,०००/- रुपये दे नाहीतर मी तुमचे हॉटेल फोडुन टाकेल व यापुढे देखील हॉटेल चालवायचे असेल तर मला महिन्याला पैसे दयायचे लक्षात ठेवा असे म्हणुन फिर्यादी यांचेकडे पैशाची मागणी केली. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला असता त्यानी फिर्यादींना हाताने मारहाण करून त्याचे गळ्यातील जबरदस्तीने चेन ओदुन • घेवुन व पैसे देत नाही ना तर, चैन घेवुन जातो असे बोलून, हॉटेल मधील सामानाची तोडफोड करून महिन्याला परो देत नाहीत ना तुम्हाला बघुन घेतो सोडणार नाही अशी धमकी देवून तिथुन निघुन गेले.. त्याबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६१३/२०२३.भा.द.वि. कलम ३९४,३८५.३२३, ५०४, ५०६, ३४

प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान यातील आरोपी नामे १) अखिल ऊर्फ ब्रिटीश अनिल पालांडे, वय २७ वर्षे, रा. विठ्ठल मंदीरामागे, माणीक कॉलनी, धानोरीगाव, विश्रांतवाडी, पुणे (टोळी प्रमुख) यास अटक करण्यात आलेली आहे.

नमुद आरोपी टोळी प्रमुख १) अखिल ऊर्फ ब्रिटीश अनिल पालांडे (टोळी प्रमुख) याने त्याचेसह अन्य सदस्यासाठी आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्ह्यात नवीन साथीदार सोबत घेवुन स्वतःचे सपटीत टोळी तयार करून स्वतःचे टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे केले असुन त्यामध्ये घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे, बेकायदेशिर जमाव जमवणे, नुकसान करून आगळिक करणे खंडणी मागणे बकायदेशिर अग्निशस्त्र जवळ बाळगणे, बेकायदेशिर पुणे प्राणघातक हत्यार जवळ बाळगणे व त्याचे सहाय्याने परिसरात दहशत निर्माण करणे इत्यादी सारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे वारंवार केलेले आहे. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केले आहेत.

दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३(२), ३(४) प्रमाणे अंतर्भाव करण्यासाठी वरीष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन पुणे श्री बाळकृष्ण कदम मा सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे श्री. संजय पाटील व मा. पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ-०४. पुणे श्री शशिकांत बोराटे यांचे मार्फतीने मा अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे, श्री रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता..

सदर प्रकरणाची छाननी करुन येरवडा पोलीस स्टेशन गु.र.नं. ६१३ / २०२३. मादवि कलम ३९४.३८५. ३२३.५०४.५०६,३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(ii). ३(२), ३(४) प्रमाणेचा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे. श्री. रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे श्री. संजय पाटील हे

करीत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे श्री रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ-०४ पुणे श्री शशिकांत बोराटे, मा.सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे. श्री. संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन, पुणे श्री बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक, गुन्हे श्रीमती कांचन जाधव, श्री जयदिप गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक महेश लामखेडे, पोलीस उप-निरीक्षक रविंद्रकुमार वारंगुळे, सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अमलदार सचिन माळी सचिन शिंदे, प्रकाश चौधरी व देविदास वाढरे यानी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त, पुणे शहर आयुक्त म्हणुन कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्राणांवर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्ते विरुद्ध गुन्हे करणारे व नागरीकां मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून,गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांना निदेश देण्यात आलेले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ६३ वी कारवाई आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!