प्रतिनिधी,

रात्री १०/१५ वा. चे सुमारास फिर्यादी या रिक्षातून प्रवास करत असताना रिक्षाचे पाठीमागुन मोटार सायकल वरून दोन इसम जाले व फिर्यादी यांचे गळ्यातील १,०७,९००/- रूपये कि.चे सोन्याचे मंगळसूत्र जोरात हिसका मारून ओढुन तेथून निघून गेले म्हणून दोन अज्ञात इसमांविरूध्द पर्वती पोलीस स्टेशन गु.र.नं. २४६/२०२३ भा.दं.वि.क. ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान आरोपी नामे १) आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी वय २५ वर्षे, रा. फ्लॅट नं. ४०१, गुरूकृपा अपार्टमेंट, टेल्को कॉलनी, दत्तनगर, कात्रज, पुणे, २) लोकेश मुकुंदा महाजन वय २४ वर्षे, रा. फ्लॅट नं.४०१, गुरूकृपा अपार्टमेंट, टेल्को कॉलनी, दत्तनगर, कात्रज, पुणे, मूळगांव- प्लॉट नंबर ७. गट नं. १२, समर्थनगर, खेडी बद्रुक, जळगांव यास अटक करण्यात आली आहे.

नमुद आरोपी टोळी प्रमुख १) आकाश ज्ञानेश्वर सुर्यवंशी (टोळी प्रमुख) याचे विरुध्द ३१ गुन्हे व लोकेश महाजन याचेवर ०८ गुन्हे दाखल असुन त्याने त्याचे साथीदारा सह संघटित गुन्हेगारी टोळी तयारी केली असुन सदर टोळीने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवून किंवा धाकदपटशा दाखवून किंवा जुलूम जबरदस्ती करून किंवा अन्य अवैध मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संघटित गुन्हेगारी कृत्य कराणारा गट तयार केला असून वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत…

दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (४) प्रमाणे अंतभाव करण्यासाठी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन पुणे श्री जयराम पायगुडे यानी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ पुणे शहर श्री. सुहेल शर्मा यांचे मार्फतीने मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील यांना प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रकरणी छाननी करून पर्वती पोलीस स्टेशन गु.र.नं. २४६ / २०२३ भा.द.वि.क.३९२.३४ या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii),३(४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. प्रविणकुमार पाटील यांनी

मान्यता दिलेली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड, पुणे. श्री. अप्पासाहेब शेवाळे हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री. संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-०३, श्री. सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड रोड, पुणे श्री अप्पासाहेब शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री विजय खोमणे, पोलीस उप-निरीक्षक जगदाळे, पोलीस अंमलदार, दिपक लोधा, महेश चौगुले, गोरख मादगुडे, राजू जाधव, कुंदन शिंदे, जगदीश खेडकर यानी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्त, पुणे शहर आयुक्त म्हणुन कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्राणांवर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुद्ध व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व नागरीकां मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ६४ वी कारवाई आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!