प्रतिनिधी,

पुणे शहरात सध्या गणेशोत्सव साजरा होत असून हडपसर पोलीस ठाणे हद्दीत भाजी मंडई, गाडीतळ परिसरात लोकांची सामान खरेदी साठी लगबग चालु असते. याच दरम्यान मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रविंद्र शेळके यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांना त्याबाबत काही सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे तपास पथक अधिकारी सपोनि विजयकुमार शिंदे, पोउपनिरी अविनाश शिंदे, व पोलीस अंमलदार असे पोलीस मित्र यांचे सोबत गाडीतळ बस स्टॉप, हडपसर माजी मंडई भागात पेट्रोलींग करीत असताना तपास पथकातील अंमलदार प्रशांत टोणपे व अजित मदने यांना गोपनीय माहीती मिळाली की, मोबाईल चोरी करणारे संशयीत हे गांधी चौक येथे थांबले आहेत.

तपास पथकाने सापळा रचून आरोपी नामे १) कौशल मुन्ना रावत वय २१ वर्ष रा. बंगलाबाजार, चारबाग रेल्वेस्टेशन जवळ, लखनौ राज्य उत्तरप्रदेश २) मंतोषसिंग श्रवण सिंह वय २२ वर्ष रा. बाबुपुर, तिनपहार रेल्वेस्टेशन जवळ जिल्हा सायरगंज राज्य झारखंड ३) जोगेश्वर कुमार रतन महतो ऊर्फ नोनीया वय ३० वर्ष रा. बाबुपुर, तिनपहार रेल्वेस्टेशन जवळ जिल्हा सायरगंज राज्य झारखंड ४) सुरज रामलाल महातो वय ३० वर्ष रा. बाबुपुर, तिनपहार रेल्वेस्टेशन जवळ जिल्हा सायरगंज राज्य झारखंड ५) एक विधीसंघर्षित बालक रा. पंडेश्वर आसनौर जिल्हा वर्धमान पश्चिम बंगाल यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांचे ताब्यात २० मोबाईल हॅन्डसेट हे मिळून आले आहे.

पुणे शहरात गणेशोत्सवा दरम्यान अधिक गर्दी असते व त्यादरम्यान मोबाईल चोरी करण्याकरीता ते १५ सप्टेंबर रोजी लखनी स्टेशन येथे एकत्र भेटले व त्यानंतर दिनांक २०/०९/२०२३ रोजी पुणे शहर स्टेशन: येथे रेल्वेने आले. त्यानंतर त्यांनी पुणे शहरात हडपसर, बंडगार्डन, स्वारगेट, फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत गर्दीचा फायदा घेवून मोबाईल चोरी केले असल्याचे सांगितले.

हडपसर तपास पथकाने आरोपीकडून आज रोजी पर्यंत हडपसर पोलीस ठाणेकडील ०४ गुन्हे उघडकीस केले आहेत. आरोपीताकडून कि रू. ३,८०,०००/- चे २० मोबाईल हँन्डसेट जप्त करण्यात आले आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास अंकुश बनसुड़े पोलीस नाईक हडपसर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे श्री. रंजनकुमार शर्मा व मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५. पुणे श्री. विक्रांत देशमुख यांचे मागदर्शनाखाली मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे. श्रीमती अश्विनी राख वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, श्री. रविंद्र शेळके पोलीस निरी (गुन्हे) श्री. विश्वास डगळे श्री. संदीप शिवले यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, नगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, मनोज सुरवरा, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रशिद शेख, पोलीस मित्र अविनाश ढगे, शुभम खाडे, कावेरी फाळके, पुनम काळे, प्रतिक माने यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!