प्रतिनिधी.

सामान्य ग्राहकांना अचूक वजन व मापाने वस्तू अथवा सेवा देण्याच्या दृष्टीने सर्व व्यापारी, औद्योगिक प्रतिष्ठान तसेच इतर वजने, मापे वापरकर्त्यांनी त्यांच्याकडील वजने, मापे व मानकांची पडताळणी व मुद्रांकन करून घ्यावे, असे आवाहन उप नियंत्रक वैध मापन शाखा पुणे यांनी केले आहे.

 

वैधमापन शास्त्र यंत्रणेमार्फत वजने, मापे व मानके यांची पडताळणी व मुद्रांकनाची कामे केली जातात. काही वजने वा मापे यांचे उपयोगकर्ते हे त्यांच्याकडील वजन व माप यांची पडताळणी व मुद्रांकन करून न घेता वापर करत असल्याचे यंत्रणेच्या निदर्शनास आले आहे. अशा उपयोगकर्त्यांची माहिती संकलित करण्याकरिता वजने व मापे यांची दुरुस्ती करणाऱ्या परवानाधारकांना प्राधिकार पत्रे देऊन विहित नमुन्याप्रमाणे सर्वेक्षण करण्याकरीता वैधमापन शास्त्र यंत्रणेने प्राधिकृत केले आहे.

 

वजने, मापे पडताळणी व मुद्रांकन न करता वापरात आहेत अशा उपयोगकर्त्यांनी जवळच्या वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या कार्यालयामध्ये संपर्क करून, वजने मापे पडताळणी व मुद्रांकन करून घ्यावे. तसेच सर्वेक्षणाकरता प्राधिकार पत्र घेऊन येणाऱ्या परवानाधारकास सहकार्य करावे, असेही सह नियंत्रक वैध मापन शास्त्र यांनी कळविले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!