प्रतिनिधी,

विश्रामबाग, येरवडा, हडपसर, हांडेवाडी,मुंढवा,लष्कर वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांवर कारवाई.

पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारला असून पोलिसांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने पोलिसांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.हणमंत दुधभाते हडपसर वाहतूक विभाग, हे ३ दिवस गैरहजर राहिल्याने २ हजार रूपये द्रव्य दंडाची शिक्षा करण्यात आली आहे.

तर येरवडा वाहतूक शाखेतील महिला पोलिस शिपाई शितल शिवराम खेडकर, पोलिस शिपाई नितीन नारायण कांबळे हे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या गाडीवर नेमणूक असताना गैरहजर राहिल्याने दोघांना २-२ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.

पोलिस नाईक सुनिल सदाशिव आगलावे हांडेवाडी वाहतूक शाखेत कार्यरत असताना, कोणाला काही न सांगता कर्तव्यावर गैरहजर राहिल्याने व मुंढवा वाहतूक विभागातील संदीप जमदाडे २ दिवस गैरहजर राहिल्याने या दोघांना २-२ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.लष्कर वाहतूक विभागातील सहाय्यक पोलीस फौजदार संजय माठेकर कोणालाही न सांगता गैरहजर राहिल्याने व विश्रामबाग वाहतूक विभागातील महिला पोलिस शिपाई सुवर्णा जगताप, हे टिळक रोड येथे कर्तव्यावर गैरहजर असल्याने २-२ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस नियंत्रण कक्षातील महिला पोलिस शिपाई सुषमा दादाराव शिर्के, विनापरवाना गैरहजर राहिल्याने २ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई वाहतूक शाखेतील पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. वाहतूक शाखेत अशी पहिल्यांदाच कारवाई झाल्याने वाहतूक विभागातील पोलिसांचे धाबे दणदणाणले आहे.

तसेच दत्तावाडी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत हनुमंत कामठेकामठे, यांचे नागरिकांप्रती असलेले वर्तन गैरवाजवी असल्याने त्यांना सक्त ताकीद ची शिक्षा देण्यात आली आहे.सदरील कारवाई अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!