प्रतिनिधी,

स्वच्छता ही सेवा (एसएचएस), 2023, या सध्या सुरुअसलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून, जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा विभागाअंतर्गत नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाचे सचिव पंकज कुमार यांनी ही देशव्यापी मोहीम यशस्वी करण्यासाठी विभागातर्फे राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा/सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित केली होती. विभागामार्फत आतापर्यंत एकूण 161 उपक्रम/कार्यक्रम हाती घेण्यात आले असून त्यामध्ये सुमारे 7232 लोकांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये श्रमदान कार्यक्रमात 2066 जणांचा सहभाग आणि 2481 जणांचा सामुहिक सहभाग असून, या द्वारे एसएचएस अभियानासाठी एकूण 14,178 मनुष्य तासांचे योगदान मिळाले. विभाग दररोज पुढील एसएचएस पोर्टल वर आपले उपक्रम अपलोड करत आहे: https://swachhbharatmission.gov.in/

एसएचएस अभियानाचा एक भाग म्हणून ‘कचरा मुक्त भारत’ या संकल्पनेनुसार आणि संपूर्ण सरकार, हा दृष्टीकोन अंगीकारून, जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने आपल्या संस्थांच्या माध्यमातून तारीखवार कृती आराखडा तयार केला होता. यामध्ये मोहिमेची उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये भरीव योगदान देण्यासाठी विभागांतर्गत प्रत्येक संस्थेच्या प्रादेशिक/क्षेत्रीय कार्यालयांमार्फत स्वच्छता मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्यात आले.

 

विभागाने मोहिमेच्या संकल्पनेवर आधारित पुढील विशिष्ट उपक्रमांची निवड केली होती:

नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा (NMCG), अर्थात राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन आणि राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालयातर्फे (NRCD) घाट आणि लगतच्या परिसराची स्वच्छता

केंद्रीय जल आयोगा (CWC) तर्फे राज्य सरकारांच्या सहकार्याने धरणे आणि आसपासच्या परिसराची (तरंगत्या कचऱ्यासह) स्वच्छता

विभागाच्या विविध संस्थांच्या मुख्य कार्यालयांजवळच्या नदी किनाऱ्यांची स्वच्छता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!