प्रतिनिधी,

कोणतीही पार्टी म्हटलं की, पार्टीला नक्की काय घालून जायचं? हा प्रत्येक मुलीसमोर पहिला प्रश्न असतो. पार्टी म्हटलं की, वेस्टर्न कपडे. त्यातही जर तो गाऊन असेल तर अजूनच छान. आजकाल रिसेप्शनमध्येही लोक सर्रास गाऊन्सचा वापर करतात. फक्त 50 रुपयांपासून गाऊन मिळणारं पुण्यातलं एक ठिकाण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पुण्यातल्या तुळशी बागेतील दुकानांमध्ये तुम्हाला 50 ते 1000 रुपयांपर्यंतच्या किंमताचे वनपीस मिळतात. हल्ली कोणत्याही कार्यक्रमात वन पीस हा आऊटफिट अनेकांचा ठरलेला असतो. स्वस्तात मस्त लूक देणारे आऊटफिट असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे

तुमची तबियत जर जास्त असेल तर तुम्ही या ठिकाणी असलेले वेगवेगळे शकता. ड्रेस घातल्यावर टमी दिसणं ही कित्येकींची समस्या आहे. पण म्हणून हे ड्रेस घालायचेच नाहीत असं नाही. या ड्रेसेसमध्येसुद्धा वेगवेगळे प्रकार येतात. नेहमीच फिटेड ड्रेस घालण्याची गरज नाही.

अम्ब्रेला स्टाइल किंवा ए-लाइन ड्रेस देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत . हे कमरेखाली लूझ असतात. त्यामुळे पोट झाकलं जातं. एम्पायर लाइन यावेळी महत्त्वाची भूमिका बजावते. एम्पायर लाइन म्हणजे ड्रेसचे विभाजन करणारी लाइन. बिलो ब्रेस्ट एम्पायर लाइनचे ड्रेस घालून किंवा लूझ फिटेड ड्रेसला बेल्ट लावून विभाजन करता

त्यामुळे ड्रेसला फिटेड लुक येतो. ड्रेस ढगळ वाटत नाही. त्याचबरोबर एखाद्या पार्टीसाठी फिटेड ड्रेस घालायचा असेलच, तर बॉडी फिटर देखील या बाजारात कमी किंमतीमध्ये उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!