प्रतिनिधी,

हॉटेल-बांधकाम व्यावसायिक विजय ढुमे याचा शुक्रवारी (२९ सप्टेंबर) सायंकाळी वडगाव बुद्रुक येथील क्वॉलिटी लॉजमधून बाहेर येत असताना दबा धरून बसलेल्या चार ते पाच जणांनी लोखंडी सळई आणि लाकडी, लोखंडी दांडक्याने हल्ला करत खून केला होता. विजय ढुमे याच्या खुनाचा उलगडा करण्यात पुणे शहर पोलिसांना अखेर यश मिळाले आहे. ढूमेचा खून अनैतिक संबंधातून झाला असून सिंहगड रोड पोलिसांकडून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेच्या प्रियकराकडून विजयचा हॉटेलच्या पार्किंगमध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला होता. सिंहगड रोड पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, धनकवडी, इंदापूर, पिंपरी चिंचवड मधून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे

पोलीस वसाहतीतील मुलांबरोबरीनेच (लाईन बॉइज) ढुमे यांचे शहरातील अनेक क्षेत्रातील व्यक्तींशी संबंध होते. हॉटेलवादातून ढुमे यांच्यावर यापूर्वी एक गुन्हा देखील दाखल झाला होता. हॉटेल आणि बांधकाम व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची अनेक अधिकारी, राजकीय व्यक्तींशी व्यावसायिक भागीदारी होती. विजय हा निवृत्त पोलिसाचा मुलगा होता. त्याचे वडिल पुणे शहर पोलीस दलात गुन्हेशाखा, सर्व्हेलन्स विभाग आणि निवृत्तीवेळी निगडी वाहतूक विभागात कार्यरत होते. सासवडनजीक असलेल्या ढुमेवाडी येथील ढुमे हे मुळचे रहिवासी होते. मागील ३० वर्षांपासून हे कुटुंब पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!