संपादक:शहानवाज मुलाणी

पुणे,ग्रामीण भागात ,शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत भीमा कोरेगाव आठवडा बाजारात दर गुरुवारी तर रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत कारेगव बाजारात दर रविवारी लाल काळा ऑनलाइन रॅकेट जुगार चालवणारा व्यक्ती नितीन गायकवाड व त्याचा साथीदार नामे (हडक्या) दोघेही रहाणार पिंपरी चिंचवड हे दोन्ही इसम व त्याचे १५ ते २० साथीदार जेकी मुंबई चे सराईत गुन्हेगार आहेत. हे सर्व आठवड्या बाजारात येणाऱ्या गोर गरीब नागरिकांना ५०० रू ला मोबाईल म्हणून जवळ बोलावून घेतात व त्यांना जबर दस्तीने खेळण्यास भाग पाडतात त्यांच्या कडील पैसे संपले की एक चान्स म्हणून पुन्हा खेळण्यास भाग पाडून इनाम लागला असे बोलून त्यांना आधी बँक अकाऊंट दाखव म्हणून त्याचे अकाऊंट मधील सर्व पैसे काढून घेतात त्या अनुषंगाने शिक्रापूर पोलिस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी,तसेच रांजणगाव पोलिस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी ह्यांना तक्रारी अर्ज देऊन सुद्धा हा व्यवसाय बंद होण्याच्या ऐवजी अगदी जोमाने सुरू आहे. स्थानिक नागरिकांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की हा व्यवसाय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तर सुरू नाही ना?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!