प्रतिनिधी,

एम न्यूज मराठी या न्यूज पोर्टलचा प्रथम वर्धापन दिन नींबूत येथील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व वही वाटप करून संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन एम न्यूज मराठी टीम च्या वतीने प्राथमिक शाळा नींबूत येथे अकरा वाजता करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत भैय्या काकडे, युवकांचे आशास्थान गौतमभैया काकडे, बा. सा. काकडे विद्यालयाचे सचिव मदनराव काकडे, माजी सरपंच राजकुमार बनसोडे, शिवाजीराव काकडे, विलासराव बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य शिरीष भैया काकडे, ग्रामपंचायत निंबूचे उपसरपंच अमर भैया काकडे, आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, चंद्रजीत काकडे, भाऊसो कोळेकर, ग्रामसेवक काळभोर, प्रसाद सोनवणे, मान्यवर पत्रकार बंधू विनोद गोलांडे, मोहम्मद शेख, संभाजीराव काकडे, विजय लकडे,शाळेच्या मुख्याध्यापिका बालगुडे मॅडम, शेंडकर मॅडम, अनपट सर, जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्भीड पत्रकारिता करून सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम न्यूज मराठीच्या माध्यमातून केले जात आहे असे अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश फरांदे यांनी केले तर आभार ऋतुजा मधुकर बनसोडे हिने मानले.

 

तसेच वडगाव निंबाळकर येथे देखील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वही व खाऊ वाटप करीत एम न्यूज मराठी न्यूज पोर्टलचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब मदने, पत्रकार अमोल गायकवाड , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहूल जाधव , उपाध्यक्ष सुशीलकुमार अडागळे , भारतीय मराठी पत्रकार संघ उपाध्यक्ष सुनील जाधव , उपक्रमशील शिक्षक अनिल गवळी, मुख्याध्यापिका सौ .विजया दगडे,सहकारी शिक्षिका सुरेखा मगदूम,मालन बोडरे,सुनिता पवार हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गवळी सर व अमोल गायकवाड यांनी केले. तर आभार फिरोज भालदार यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!