संपादक : शहानवाज मुलाणी

आज १० ऑक्टोबर… जागतिक मानसिक आरोग्य दिन,

लोकांना मानसिक आजारांबद्दल माहिती देणे हा या दिनामागचा मुख्य उद्देश आहे. तसेच, लोकांना स्वतःच्या मानसिक आरोग्या विषयी शिक्षित करण्याचा प्रयत्न या दिवशी केला जातो…

♻️ हा दिवस पहिल्यांदा १९९२ मध्ये वर्ल्ड मेंटल हेल्थ असोसिएशनच्या पुढाकाराने साजरा करण्यात आला…

_आपल्याला मानसिक आजार आहे, हे आपण एक्सेप्टच करत नाही, कोणीही त्याचा स्वीकारच करत नाही. आपण बेचैन असतो, अस्वस्थ असतो हे natural आहे…_यात वावगं काही नाही… म्हणजे ही एक गंभीर मानसिक आजाराची सुरुवात सुद्धा असू शकते याचा कोणी विचारसुद्धा करत नाही. या गोष्टी स्वीकारून आपण चांगल्या मेंटल हेल्थ साठी प्रयत्न केले पाहिजेत…

♻️ मेंटल हा शब्द आला म्हणजे वेडे असणे असे नव्हे तर…शारीरिक दृष्ट्या जसे सुदृढ असणे आवश्यक आहे, मानसिक दृष्ट्या ही सुदृढ असणे तितकेच महत्त्वाचे आहे…

♻️ *_मानसिक आजार म्हणजे काय?_*

मेंदूचे काम बिघडल्यावर भावनिक किंवा बौद्धिक पातळीवर दिसणाऱ्या लक्षणांना आपण मानसिक आजार म्हणतो. मानसिक आजाराचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मेंदूत होणारे सूक्ष्म बदल. हे बदल साधारणपणे तपासणीत दिसून येत नाहीत. मानसिक आरोग्या मध्ये आपले भावनिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण समाविष्ट आहे…

♻️ *आपले शरीर आणि मन वेगळे नाहीत, त्यामुळे मानसिक आजारामुळे तुमच्या शरीरावर परिणाम होऊ शकतो हे आश्चर्यकारक नाही…*

मानसिक आरोग्याच्या समस्यामुळे काही शारीरिक लक्षणे दिसून येऊ शकतात .

उदासीनता डोकेदुखी, थकवा आणि पचन समस्य येऊ शकतात आणि चिंता पोटात अस्वस्थता निर्माण करू शकते.

👇🏻👇🏻👇🏻

♻️ *भूक…*

योग्य वेळी आणि पुरेशी भूक लागणे हे मानसिक स्वास्थ्याचे लक्षण आहे. या उलट अन्नावरची वासना उडणे, भूक न लागणे किंवा अति खाई खाई होणे हे मानसिक अस्वस्थाचे लक्षण आहे. खूप राग आला, ताण आला किंवा दुःख झाले तर आपली भूक मरते. काही लोकांमध्ये फार टेन्शन असेल किंवा अभ्यासाच्या वेळेत विद्यार्थी खूप खाऊ खाऊ करतात. हे खावं, ते खावं असं सतत त्यांना वाटत राहतं. एकाकीपणामध्ये सुद्धा माणसं हॉटेलच जाऊन भूक नसताना ही खाणं पसंत करतात. त्याचा भुकेशी काही संबंध नसतो पण मानसिक आरोग्याशी, मानसिक बदलांशी, बिघाडांशी संबंध असतो…

♻️ *झोप…*

नियमित वेळेवर, शांत, गाढ झोप लागणे आणि ७-८ तासानंतर आपोआप जाग येऊन उत्साह वर्धक, ताजेतवाने वाटणे हे निरोगी मनाचे लक्षण आहे.

निद्रानाश, अपुरी झोप, अस्वस्थ झोप, मध्ये मध्ये जाग येणे, दचकून जाग येणे, रात्रभर झोप झाल्यानंतर ही उठल्यानंतर थकवा वाटणे ही मानसिक आजाराची लक्षणे असू शकतात…

Depression सारख्या काही आजारांमध्ये रुग्णाला अती झोप येते. ते दिवस दिवस झोपून राहतात. खाण्यापिण्याचे ही त्यांना भान राहत नाही…

♻️ *विचारशक्ती…*

स्वच्छ आणि योग्य विचार करता येणे, समस्यांकडे practically पाहता येणे, त्यामुळे येणाऱ्या तणावांकडे वैचारिकदृष्ट्या पाहून योग्य ते नियोजन करणे हे मानसिक स्वास्थ्य सुदृढ असल्याचे दर्शवते. योग्य तेथे रिस्क घेण्याची, तसेच कम्फर्ट झोन सोडून बाहेर येण्याची तयारी असणे हे सुदृढ मानसिक आरोग्याचे लक्षण आहे.

छोट्या छोट्या प्रश्नांवर हातपाय गळून जाणे, घरात काही अप्रिय घटना ( मृत्यू, आर्थिक संकट, आजारपण इ. ) घडली तर गळून जाणे, विचार करण्याची शक्ती नाहीशी होणे, कम्फर्ट झोनच्या बाहेर जाण्याला घाबरणे, हे मानसिक आजाराचे लक्षण आहे.

अशा परिस्थितीत काही माणसं एकदमच हवालदिल होतात आणि कशाशीच काही संबंध नसल्यासारखी वागतात. तर काही लोक याच घटनांचा आधार घेऊन पूर्वीपेक्षा छान, बलवान, खंबीर होतात…

♻️ *अपयश…*

अपयश पचवता येणे, त्यातून बाहेर पडून पुन्हा यशाच्या मार्गावर प्रयत्न करणे तसेच यशाने हुरळून न जाणे हे मानसिक आरोग्य चे लक्षण आहे. पौगंडावस्थेतील तरुण मुले -मुली डिप्रेशन मध्ये जातात आणि आपल्या आयुष्याचा अंत सुद्धा करून टाकतात. सारासार विचार न करता चुकीचे पाऊल उचलण्याचा संभव असतो.

♻️ *उपाय…*👇🏻

जेव्हा जेव्हा तुम्हाला मानसिक तणाव जाणवत असेल तेव्हा एकटे राहून त्याच्याशी संघर्ष करण्याऐवजी, ज्याच्याकडून तुम्हाला सकारात्मकता मिळते अशा व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला बरे वाटते. अशालोकांची तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी खूप मदत होते. हा मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा तुमचा जोडीदारही असू शकतो…

♻️ जर तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटत असेल आणि रडावेसे वाटत असेल तर थोडा वेळ डोळे बंद करून एके ठिकाणी बसा. पाणी प्या आणि दीर्घ श्वास घ्या. यामुळे, अस्वस्थते मुळे वेगवान हृदयाचे ठोके सामान्य होतील. आणि तुमचं मनही थोडा वेळ शांत राहील…

♻️ तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी मनातून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपल्या आवडत्या गोष्टी करायला सुरुवात करा. तुम्हाला आनंद देणार्‍या गोष्टींना वेळ दिल्याने तुम्ही त्या कामात व्यस्त राहता. आणि तणाव विसरण्यास मदत होते. यासाठी तुम्ही काही चित्रपट पाहू शकता, खरेदी करू शकता, मित्रांबरोबर पार्टी करू शकता किंवा तुमची कोणतीही आवड फॉलो करू शकता…

♻️ तणाव दूर करण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे काही दिवसांसाठी तुम्ही बाहेर सहलीला जाऊ शकता. यामुळे एक वेगळ्या प्रकारची शांतताही मिळते. स्वत:चा शोध घेता येतो…

♻️ सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठी थोडा वेळ काढणे. स्वतःचं आत्मपरिक्षण करा. असे केल्याने अनेक वेळा तुम्हाला तुमची चूक नेमकी कुठे झाली आहे हे समजण्यास मदत होईल. तुमच्या चुका समजून घेऊन त्यावर काम करण्याचा हा एक चांगला प्रभावी मार्ग आहे. चांगल्या गोष्टी करत रहा, एखादा तरी छंद बाळगला पाहिजे. निसर्गात रमता आले पाहिजे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!