प्रतिनिधी,

परराज्यातील मुली / महिला यांना काही इसम वॉट्सअॅप द्वारे संपर्क करुन जास्तीच्या पैशांचे अमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी पुणे शहरात बोलावुन घेवुन त्यांना वेश्याव्यवसाकरीता पुरवित असलेबाबत सामजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा येथील पोलीस अमलदार तुषार भिवरकर अमेय रसाळ यांना गोपनिय माहीती प्राप्त झाली.

त्यानंतर अशा एजंट व्यक्तींची गोपनीय माहीती काढून सामाजिक सुरक्षा विभाग कडील पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी दि. ११.१०.२०२३ रोजी सापळा रचुन बनावट ग्राहकाकरवी वेश्यागमनासाठी मुलींबाबत विचारणा केली असता एजटने विमाननगर चौकातील हॉटेल येथे दोन रुम बुक करण्यास सांगितल्या. त्यानंतर सदर ठिकाणी दोन मुली हॉटेल मधील बनावट ग्राहक थांबलेल्या रूम मध्ये आल्यानंतर अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी दोन मुलींना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता एजट चंदननगर परीसरात असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त करून हनुमान व्यायाम शाळेशेजारी चंदननगर भाजीमार्केट येथे एजट (आरोपी) मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन सदर एक आरोपी यांच्या विरूध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे गुरन ६९४/२०२३ भादवि कलम ३७० ३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ४.५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन दोन पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे. पुढील तपास येरवडा पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी करीत आहेत.

सदरची कारवाई श्री. रितेश कुमार मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर. श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्री. अमोल झेंडे, याचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्ष, अजय राणे, तुषार मिवरकर, रेश्मा केक ओंकार कुंभार, सागर केकाण, अमेय रसाळ, किशोर भुजबळ, संदीप कोळगे या पथकाने यशस्वी केली आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!