संपादक:शहानवाज मुलाणी

येरवडा, लक्षीनगर येथील श्रीमाळ हॉस्पिटल येथे आपल्या विभागामार्फत अनाथ बेघर मुलांचे घरटे प्रकल्प वसतिगृह असून, सदर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना तेथे जी संस्था सांभाळते, त्या संस्थेकडून विद्यार्थ्यांची बऱ्याच प्रमाणात हाल होत आहेत .

याबाबत मुलांना विचारले असता, बरेच विद्यार्थी दोन ते तीन महिन्यांपासून अनवाणी पायाने बिगर चपला बुटाचे शाळेत जातात, असे सांगितले.

सदर विद्यार्थ्यांना वेळेवर अन्नपुरवठा होत नसून, सदरील विद्यार्थी सकाळी 11 ते 5 नेताजी सुभाषचंद्र बोस , आचार्य अत्रे, यशवंतराव चव्हाण या शाळांमध्ये जात असताना त्यांच्या पायात कुठल्याही प्रकारची चप्पल अथवा बूट नसतो. हे सर्व लहान बालगोपाळ अनवाणी पायाने रोज ये-जा करतात. ज्या संस्थेला या घटप्रकल्पाचे देखरेख करण्यासाठी महापालिकेतर्फे लाखो रुपयांचा निधी दिला जातो, तरीही संस्था कुठल्याही प्रकारची व्यवस्थित पणे देखभाल करत नाही अथवा ते कामात कचुराई करत असल्याचे जाणवते.

अशा विद्यार्थ्यांना अनवाणी पायाने जात असताना बऱ्याच प्रमाणात पायाला इजाही होतात, तरीही विद्यार्थी असेच चालत असतात.

सदर विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे हालअपेष्टा जर सहन करायची वेळ येत असेल, तर सदर देखभाल करणारी संस्था काय कामाची? या संस्थेवर तत्काळ कारवाई याबाबत या विद्यार्थ्यांना योग्य ती सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावी, ही विनंती नागरवस्ती समाज विकास विभागाचे उपायुक्त श्री. नितीन उदास साहेब यांना फोनवरून करण्यात आली. तातडीने त्यांनी त्यांच्या वतीने समाज विकास अधिकारी श्री मुळे साहेब यांना सदर ठिकाणी पाठवून सर्व परिस्थिती पाहण्यास सांगितले. यावेळी श्री मुळे साहेब यांना सदर प्रकारचे एमआयएम पक्षाच्या मा. नगरसेवक अश्विनी डॅनियल लांडगे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे, सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र भोसले, अकबर खान, गणीभाई शरीफ, अब्बू भाई शेख व स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!