प्रतिनिधी,

इराणी मार्केट, सिध्दार्थनगर, गाडीतळ, सौ. शीला साळवे भाजी मार्केट येथे क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने मंगळवार (दि. १०) मोठा फौज फाटा आणूनही तुरळक कारवाई केल्याने क्षेत्रीय कार्यालयाची अतिक्रमण कारवाई फक्त एक देखावा अशी बातमी नेशन न्यूज लाईव्ह ने केली होते. याची दखल घेत क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे यांनी आज याच परिसरात मोठी कारवाई केली. अनेक वर्षानंतर अशी मोठी कारवाई करीत रस्ते मोकळे केल्याने येथील नागरिकांनी समाधानव्यक्त केले.

येरवड्यातील सदर परिसात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. यातून वाहतूक कोंडी होत होती, खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होत होता. त्यामुळे कारवाईची मागणी होत होती. नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीमुळे या परिसरात कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईत अतिक्रमण नियंत्रण विभागाचे माधव जगताप, क्षेत्रीय कार्यालय सहायक आयुक्त इंद्रायणी करचे, विभागीय उपविभागीय अधिकारी शाम अवघडे, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक संजय कुंभार, निरीक्षक भिमाजी शिंदे, १० सहायह अतिक्रमण निरीक्षक, २६ महाराष्ट्र सुरक्षा बलचे रक्षक, ४२ बिगारी, ३ जेसीबी, २ गॅस कटर असा मोठा लवाजमा होता. कारवाई वेळी मोठा जमाव जमा झाल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आकाशचिन्ह विभागानेही…

येरवडा क्षेत्रीय कार्यालयाने शुक्रवारी (दि. १३) मोठी कारवाई केली. संयुक्तरित्या केलेल्या या कारवाईत मात्र मार्केटमधील फ्लेक्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. बाजारात अनधिकृत फ्लेस लावले जात असून अनेक कार्यकर्त्यांनी फ्लेक्सच्या जागा ताब्यात घेतलेल्या आहेत, फ्लेक्स लावण्यासाठीचे बांबू वर्षानुवर्ष तसेच ठेवले जात आहेत. आकाश चिन्ह विभाग मात्र तुटपुंजी कारवाई करते, या विभागानेही मोठी कारवाई करणे गरजेचे आहे अशी देखील चर्चा स्थानिक नागरिकांना मध्ये सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!