संपादक: शहानवाज मुलाणी

पुण्या मध्ये मा.पोलिस आयुक्तांनी अवैध धंदे ,मटका , जुगार हे पूर्णतः बंद केलेले असून ह्याच पुणे मधील चंदन नगर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये. १)खराडी बायपास येथे तुलसी हॉटेल शेजारी,

 

 

२)उपाला हॉटेल पाठीमागे,

३)साईनाथ नगर एचपि पेट्रोल पंपाच्या पाठी मागे,

 

४)साईनाथ नगर बस स्टॉप पाठीमागे,मटक्याचे,जुगाराच्या अड्डे पोलिसाना नजुमानता अगदी जोमाने सुरू आहेत. चंदन नगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ह्यांना वारंवार तक्रारी अर्ज देऊन सुद्धा चंदननगर पोलिस स्टेशन हद्दीत हे मटक्याचे , जुगाराचे अड्डे अगदी जोमाने सुरू आहेत. ह्या अवैधरित्या जुगार अड्डे,मटक्याचे धंदे चालवणाऱ्यांना पोलिस अधिकाऱ्यांनी तर पाठीशी घालण्याचे काम तर करत नाही ना? अशी चर्चा स्थानिक नागरिकांना मध्ये सुरू आहे. तर यांच्यावरती चंदननगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी कार्रवाही करतील का? अशी देखील चर्चा स्थानिक नागरिकांना मध्ये सुरू आहे?ह्या मागचे नेमके सत्य काय आहे. ह्या मागचा हफ्ते खोर अधिकारी किंवा कर्मचारी कोण आहे? ह्याचा खुलासा लवकरच नेशन न्यूज लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना समोर येणार आहे.

संबंधित चालू असलेले अवैधव्यवसाय मधील आर्थिक देवाण घेवाण झालेला चा पुरावा नेशन न्यूज लाईव्हच्या हाती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!