प्रतिनिधी.

उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक २१/०७/२०२३ रोजी एमईएस मेट उत्तमनगर पुणे येथे मार्शल अमलदार पोलीस अगलदार सचिन गायकवाड हे गस्त करत असताना त्यांना महिंद्रा पिकअप गाडीचा संशय आल्याने त्यांनी ती गाडी चेक केली असता पोलीसांना पाहून गाडीतील ०५ संशयित गाडी सोडून पळुन गेले. पोलीस अमलदार गायकवाड यांना त्या गाडीत कोल्हापुर पध्दतीच्या चा-याचे पाणी अडविण्यासाठी वापरण्यात येणारे लोखडी लट मिळुन आल्या. गाडीमालक सुरेंद्र चंद्रीका यादव वय २५ वर्ष रा. कोंढवे धावडे, पुणे मुळगाव-सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश यास ताब्यात घेवुन त्याचेकले सखोल तपास केला असता तपासात सुरेंद्र यादव व त्याचे इतर ०६ साथीदारानी बहुली.गावाजवळील कोल्हापुरी पध्दतीच्या बधा वावरून लोखडी प्लेट चोरल्याचे निष्पन्न झाले.

 

पोलीसांनी खडकवासला पाटबंधारे विभागाशी संपर्क करून खात्री केली असता मुठा नदीच्या कोल्हापुर पध्दतीच्या बंधा-यावर एकुण १२० लोखंडी वर्गेपैकी १०८ लोखडी बर्गे (प्लेट) चोरीस गेलेले आहेत. त्याबाबत पाटबंधारे विभागाने पोलीसात तक्रार दिल्यानंतर त्याबाबत गुन्हा दाखल करून आरोपी १. सुरेंद्र चंद्रीका यादव वय २५ वर्ष रा. कोंढवे धावडे, पुणे जि.सिध्दार्थनगर राज्य उत्तरप्रदेश २ रामरक्षा धरमराज पासवान वय ३८ वर्षे रा. विदयावेली शाळेजवळ, सुसपाषाण रोड, सुसगाव, पुणे ३. मुनीराम संतराम यादव वय ४० वर्षे जि सिध्दार्थनगर उत्तरप्रदेश ४. राहुल अमिरका यादव वय १९ वर्षे जि-सिध्दार्थनगर ५. प्रिन्स ऊर्फ मिथोलेस हरिचंद्र यादव वय १८ वर्षे जि सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश ६ प्रदीप आंबिका कनोजिया वय १८ वर्षे जि-सिध्दार्थनगर उत्तरप्रदेश यांना अटक केली असुन चोरीस गेलेल लोखडी प्लेट व चोरीकरता वापरलेली वाहने जप्त केली आहेत.

 

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप- आयुक्त परी ०३श्री.सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त कोथरुड विभाग श्री भिमराव टेळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तमनगर पोलिस स्टेशन श्री. किरण बालवडकर पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती शबनम शेख यांच्या सुचनाप्रमाणे तपासी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक उमेश रोकडे सहा पोलीस निरीक्षक दादाराजे पवार पो. अमलदार तानाजी नागरे गणेश हजारे, सचिन गायकवाड, तुषार किंद्रे, ज्ञानेश्वर तोडकर, समीर पवार, परमेश्वर पाडाळे यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!