प्रतिनिधी,

सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६५/२०२३.भा.द.वि. कलम ४५४,४५५,३८० या गुन्हयाचा तपास, युनिट-२ प्रभारी अधिकारी श्री नंदकुमार बिडवई यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी. नितीन कांबळ, पोलीस अंमलदार, संजय जाधव, अमोल सरडे, गजानन सोनुने, पुष्पेंद्र चव्हाण अशी टिम तयार करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मा. वरिष्ठांनी महत्वाच्या सुचना दिल्या होत्या.

त्याअनुषंगाने युनिट-२ कडील पोलीस अमलदार गजानन सोनुने व अमोल सरडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीचे आधारे आरोपी १ ) अंकुश राम गोणते, वय-३२ वर्षे, रा.स.नं. १११, दत्तनगर, सुतारदरा, कोथरुड, पुणे २) हर्षद गुलाब पवार, वय-३० वर्षे रा. सर्व्हे नं. १११, दत्तनगर, सुतारदरा कोथरुड, पुणे यांना अटक करण्यात आली आहे. नमुद आरोपी अंकुश गोणते याने त्याचा जेल मधील साथीदार हर्षद पवार याला जामीनावर सोडण्यासाठी घरफोडी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर साथीदार हर्षद पवार हा जामीनावर सुटताच दोघांनी मिळुन पुणे शहर तसेच सातारा जिल्हा येथे घरफोडी चोऱ्या केल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन दाखल गुन्हयातील ५७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व इतर गुन्हयातील १४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच गुन्हे करण्यासाठी वापरलेली हिरो स्प्लेंडर कंपनीची दुचाकी गाडी, लोखडी कटावणी, दागिने वजन करण्याची इलेक्ट्रॉनिक मशीन, स्कु-ड्रायव्हर असा सर्व मिळुन १२,०१,६३२/- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून दाखल गुन्हयाचे व्यतरिक्त इतर ०४ गुन्हे असे एकुण ०५ गुन्हे उघडकीस आणले आहेत..

आरोपी अंकुश गोणते हा खुनाच्या गुन्हयात जेल मध्ये होता. त्यादरम्यान त्याची ओळख अट्टल घरफोडी चोर हर्षद गुलाब पवार याचे सोबत झाल्याने, त्यांनी जामीनावर सुटल्यानंतर घरफोडी चो-या करण्याचे ठरविले होते. सदर ठिकाणी मिळालेले सोन्या-चांदीचे दागिने हर्षद पवार हा त्याचे दिमतीत विक्री करीत असल्याने त्यास दाखल गुन्हयात भा.द.वि. कलम ४११ प्रमाणे कलमवाद करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी गा.पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, गा.पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई, गुन्हे शाखा युनिट-२, पुणे शहर, सपोनि वैशाली भोसले, विशाल मोहिते, पोउपनि नितीन कांबळे, पोलीस अंमलदार गजानन सोनुने, अमोल सरडे, पुष्पेंद्र चव्हाण, संजय जाधव, नागनाथ राख, गणेश थोरात, साधना ताम्हाणे, मोहसिन शेख, निखिल जाधव, शंकर नेवसे, उज्वल मोकाशी, उत्तम तारु, विनोद चव्हाण, नामदेव रेणुसे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!