प्रतिनिधी,

फिर्यादी व त्यांचे मित्र आपआपले मोटार सायकलने दिये घाट उतरत असताना एका पांढरे रंगाचे कारने फिर्यादी यांचे गाडीचे पुढे येवून गाडी आडवी मारली त्यानंतर फिर्यादी यानी त्यांचेकडे दुर्लक्ष करुन थोडे पुढे आले असता पालखी विसावा, वडकी, येथे पुन्हा त्याच गाडीने फिर्यादी यांचे गाडीला कट मारुन गाडीचे समोर त्याची चारचाकी गाडी थांबवली व त्या गाडीतुन तीन अनोळखी इसम उतरले व फिर्यादी याना जोरजोरात ओरडून शिवीगाळ करत जवळ आले. फिर्यादी हे गाडीवर एकटेच असल्याने ते अनोळखी इसमांना पाहून घाबरून गेले. त्यांचे पैकी लाल टि-शर्ट व काळी पट परिधान केलेल्या इसामाने त्याचे जवळील पिस्तुलासारखे हत्यार फिर्यादी याना दाखवुन म्हणाला की “तुझ्याकडे किती पैसे आहेत ते गुपचुप काढून दे जास्त आरडा-ओरडा केला व जास्त बोलला तर जागेवरच खल्लास करुन टाकतो असे म्हणून धमकावले व फिर्यादी यांचे पेंन्टच्या खिशामध्ये १५००/- रुपये रोख रक्कम काढून तेथुन निघून गेले. म्हणून फिर्यादी यांचे फिर्यादीवरुन लोणी-काळभोर • पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ४४६ / २०२३ भादविक ३९२.३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्हयाच्या तपासा दरम्यान आरोपी नागे १) निलेश मल्हारी बनसुडे, वय-२६ रा. राजवेली नगर चौक, बनसुडे मळा, इंदापूर, ता. इंदापूर, जि.पुणे (टोळी प्रमुख) २) ओम सोमदत्त तारगावकर, वय-२१ रामतीनगर, इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे ३) रोहीत मच्छिंद्र जामदार, वय-२३ रा. जामदार गल्ली, कसबा पेठ, इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे यांना अटक करण्यात आली आहे.

नमुद आरोपी निलेश मल्हारी बनसुडे (टोळी प्रमुख) याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असून, त्याने बेकायदेशीर मार्गाने स्वतसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तींसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देऊन किंवा धाकदपटशा दाखवून किंवा जुलूम जबरदस्ती करून किंवा अन्य अवैध मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालू ठेऊन संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संघटित गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन सदर टोळीने मागील १० वर्षात खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, जडवणूक करणे बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. सदरचे गुन्हे हे अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्यासाठी टोळीचे वर्चस्वासाठी व दहशत कायम ठेवण्यासाठी तसेच नागरिकाच्या मनात भिती निर्माण करण्यासाठी सातत्याने चालू ठेवून संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्त पणे गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत.

दाखल गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३(४) चा अंतर्भाव करणेकामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस ठाणेचे श्री. दत्तात्रय चव्हाण यानी मा.पोलीस उप-आयुक्त परि-५, पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख याचे मार्फतीने मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रदेशिक विभाग पुणे शहर श्री रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केलेला होता.

सदर प्रकरणाची छाननी करून लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गु.नं.४४६ / २०२३ नादविक

३९२.३४ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९

कलम ३ (१) (ii)३ (२), ३(४) चा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे

शहर. श्री. रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग श्री. रंजनकुमार शर्मा, मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- ०५. श्री. विकांत देशमुख, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग श्रीमती अश्विनी राख याचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे श्री. दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. सुभाष काळे, पोलीस उप-निरीक्षक हनुमंत तरटे, सर्वेलन्स अमलदार, संदीप धनवटे, तेज भोसले, मगेश नानापुरे, मल्हार ढमढेरे, संदीप धुमाळ यांनी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्रणावर भर देवुन शरिराविरुध्दचे व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ६९ वी कारवाई आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!