प्रतिनिधी,

फिर्यादी हाफिजुर अन्सारी, वय ५० वर्षे रा. नानापेठ, पुणे यांचा केक मटेरियल विक्रीचा व्यवसाय असुन

गेली २५ वर्षापासुन अशोकनगर कॉलनी काशेवाडी भवानी पेठ, पुणे येथे रिगल एजन्सी नावाने केक मटेरिअल विक्रीचे होलसेल दुकान आहे. दिनांक १५/१०/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता ते स्वतः दुकान बंद करून घरी गेले होते. त्यावेळी आठवडयातील व्यवसायातून जमा झालेली रोख रक्कम रू.५,२५,०००/- मोजुन दुकानातील ड्रावर मध्ये ठेवली होती तसेच शनिवार व रविवार दोन दिवस बँकेला सुट्टी असल्याने बँकेत रक्कम भरणा केली नव्हती. त्यानंतर दिनांक १६/१०/२०२३ रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ०८.०० वा. दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे शटर उचकटलेले दिसले ड्रावर मध्ये ठेवलेली रोख रक्कम रू.५.२५,०००/- मिळुन आली नाही. सदरबाबत त्यांनी तात्काळ खडक पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने त्यांचे तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात खडक पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रमांक ३६२/२०२३ भा.दं.सं. कलम ३८०, ४५७ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला…

घरफोडी सारखा गंभीर गुन्हा घडल्याने त्याचा तपास करून आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरिक्षक खडक पोलीस स्टेशन पुणे श्री सुनिल माने, पोलीस निरिक्षक गुन्हे श्री संपतराव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ सहायक पोलीस निरिक्षक राकेश जाधव व तपास पथकातील अंमलदार, सहायक पोलीस निरिक्षक नितीनकुमार नाईक व पोलिस अगंलदार यांचे तपास पथक नेमण्यात आले. नेमण्यात आलेल्या पथकामार्फत अज्ञात चोरट्याचा शोध चालु असताना तपास पथकातील पो. अमलदार आशिष चव्हाण, वाबळे यांना त्यांचे खब-यामार्फत माहीती मिळाली की काशेवाडी येथे राहणारा झुरळ्या ऊर्फ आकाश पाटोळे याने रात्री अशोकनगर कॉलनीत चोरी केली असुन तो पळुन जाण्याच्या तयारीत आहे. अशी माहीती मिळाल्यानंतर तात्काळ वरील दोन पथकामार्फत त्या ठिकाणी जावुन सापळा रचुन पळुन जाण्याच्या तयारीत असलेल्या आकाश ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे, वय २७ वर्षे, रा. अंजुमन गरजीद शेजारी, काशेवाडी, भवानी पेठ, पुणे यास दत्त मंदीरा जवळुन ताब्यात घेवुन गुन्हयात अटक करण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडुन गुन्हयात चोरी करुन नेवुन लपवुन ठेवलेली रोख रक्कम

रू.५,२५,०००/-हस्तगत करण्यात आली. आकाश ऊर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असुन नमुद घरफोडी ची तक्रार प्राप्त झाल्यांनतर अवघ्या दोन तासांतच चोरी केलेल्या संपूर्ण मुद्देमालासह आरोपीच्या मुसक्या आवळण्यात खडक पोलीसांना यश आले आहे.

नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ श्री. संदिपसिंह गिल, मा. सहा पोलीस आयुक्त फराराखाना विभाग पुणे श्री अशोक घुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन श्री सुनिल माने.. पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. संपतराव राऊत, तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक, श्री राकेश जाधव सहायक पोलीस निरीक्षक श्री नितीनकुमार नाईक श्रेणी पो.उप निरिक्षक अजीज बेग, पोलीस अमलदार संदिप तळेकर, आशिष चव्हाण सागर घाडगे मंगेश गायकवाड, सागर कुडले अक्षयकुमार बाबळे रफिक नदाफ, लखन ढावरे, समीर तांबोळी, तेजस पांडे, अश्रफ शेख यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!