संपादक: शहानवाज मुलाणी

पुणे – अल्पवयीन युवती सोबत विवाह करून तिला आठ महिन्यांची गरोदर केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी पतीसह सासू-सासरे व पीडित मुलीच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे. ससून हॉस्पिटलमध्ये हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आरोपी पती एकनाथ मधुकर सुतार (वय 23), सासरे मधुकर साधू सुतार (वय 70), सासू मालन मधुकर सुतार (वय 60, तिघेही रा. मु. पो. कोल्लेर, ता. गेवराई, बीड) यांच्यासह वडील किरण रामदास सरोदे (वय 40)आई वनिता किरण सरोदे (वय 35,दोघेही रा. जयजवाननगर, येरवडा) यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदयासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कायद्यानुसार तसेच विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन युवती ही 19 ऑक्टोबर रोजी आठ महिन्यांची गरोदर असल्यामुळे तपासणीसाठी ससून हॉस्पिटल येथे गेली होती. ससून रुग्णालयाकडून याबाबतची माहिती येरवडा पोलिसांना कळविण्यात आली. त्यानुसार येरवडा पोलीस स्टेशन मधील महिला पोलीस अंमलदार वैशाली सोपान पुंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पीडित मुलगी ही अल्पवयीन असताना 28 मे 2023 रोजी तिच्या आई-वडिल तसेच सासू सासरे यांनी तिचा विवाह करून दिला. आरोपी पती याने अल्पवयीन असल्याची माहिती असून देखील तिच्यासोबत विवाह करून तिला आठ महिन्यांचे गरोदर केले. त्यानुसार येरवडा पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती प्रेरणा कुलकर्णी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!