प्रतिनिधी,

दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून देशभर पाळला जातो. या दिवशी संपूर्ण वर्षात आपले कर्तव्य बजावत असताना कामी आलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देऊन श्रध्दांजली वाहण्यात येते. हा दिवस पोलीस दलाला अभिमानाचा, शौर्याला मानवंदना देण्याचा, त्याचबरोबर आपल्या जुन्या सहका-यांच्या स्मृतीने मन हेलावणाराही असतो.

२१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जाण्यास १९५९ मध्ये लडाख भागातील सरहद्दीवर झालेली घटना कारणीभूत ठरली. भारत चीन सरहद्दीवर लडाख भागात १८ हजार फुट उंचीवर हॉट स्प्रिंग्ज नावाचे ठिकाण आहे. २१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी हॉट स्प्रिंग्ज येथे गस्त चालु होती. गस्ती तुकडी नेहमीप्रमाणे गस्त घालण्यासाठी कुच करत हॉट स्प्रिंगच्या पुर्वेला ०६ मैल दुर ती आली असताना पर्वताच्या डाव्या बाजुला तुकडीच्या नेत्याला काही संशयास्पद खुणा दिसल्या. तुकडी त्या खुणांच्या अनुरोधाने पुढे चालू लागली आणि अचानक भयानक गोळीबार सुरू झाला. त्याठिकाणी पोलीस वीरानी शौर्याने तोंड दिले. ही विशेष लढाई लढता लढता यापैकी १० गस्ती शिपायांना वीरमरण आले व ९ जण जखमी अवस्थेत शत्रुच्या हाती सापडले, हे १० अमर शिपाई होते पुरणसिंग, धरमसिंग, इगजित सुबा, नोबु लामा, शिवनाथ प्रसाद, शेरिंग नोरबु, इमामसिंग, सवनसिंग, बेगराज आणि माखनलाल असे होते.

त्यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या छावणीवरही अचानक चिनी सैन्यांनी हल्ला केला होता. या लढाईत कामी आलेल्या या शुर पोलीस जवानांपैकी पश्चिम बंगालचे ३, हरियाणा २, पंजाब २. उत्तर प्रदेश- २, हिमाचल प्रदेश १ असे होते. ही बातमी वा यासारखी सा-या देशभर पसरली. १३ नोव्हेंबरला चिनी सैनिकानी या हुतात्म्यांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. १४ नोव्हेंबरला सकाळी ०८/०० वा हॉट स्प्रिंग्ज येथे त्यांच्या वर सन्मानपुर्वक अंत्यविधी करण्यात आले. त्यावेळी प्रत्येक राज्यातील पोलीस दलानी त्या त्या ठिकाणी या वीरांना श्रध्दाजली अर्पण केली.

त्यानंतर पाटणा येथे १९५९ साली झालेल्या अखिल भारतीय पोलीस स्पर्धांच्या वेळी सर्वांनी अशी शपथ घेतली. ‘आमच्या हया वीर हुतात्म्यांचे स्मरण आम्ही दरवर्षी २१ ऑक्टॉबरला पोलीस हुतात्मा दिन पाळुन करू आणि तेव्हापासून दरवर्षी हा दिन भारत वर्षात मोठया सन्मानाने ‘पोलीस हुतात्मा दिन’ म्हणुन पाळण्यात येतो. राज्या राज्यातून पोलीस दले या हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी संचलन आयोजीत करून त्यांना मानवंदना देतात.

दि. १ सप्टेंबर २०२२ ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत देशातील सर्व राज्यात पोलीस दलाचे पोलीस जवान (सर्व दर्जाचे) असे एकुण १८८ जवान यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देह धारातीर्थी ठेवले. त्यामध्ये महाराष्ट्रातील १. सहा.पो.निरी. सुदर्शन भिकाजी दातिर २. पो. हवा. गौरव नथुजी खरवडे ३.पो.हवा. जयंत विष्णुजी शेरेकर ४. पो. हवा. विठ्ठल एकनाथ बदने ५.पो.ना. संजय रंगराव नेटके ६. पो. ना. अजय बाजीराव चौधरी अशा एकुण ०६ पोलीस जवानांचा समावेश आहे. मा. वाइस एडमिरल (अजय कोच्छर), ए.व्हि.एस.एम. एन. एम. कमांडट, नॅशनल डिफेन्स

अॅकॅडमी, खडकवासला, पुणे हे वरील हुतात्म्यांना दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ०८/०० वा.

पोलीस संशोधन केंद्र, पाषाण रोड, पुणे येथे श्रध्दांजली अर्पण करणार आहेत. सदर कार्यक्रमास

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक व इतर वरिष्ठ

पोलिस अधिकारी हे हजर राहणार आहेत. तरी नागरीक व प्रसार माध्यमांना आवाहन करण्यात येते की, पोलीस हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आपण दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ०७/५० चा. चे पुर्वी पोलीस संशोधन

केंद्र, पाषाण रोड, पुणे येथे उपस्थित राहावे. सर्व वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी होणेस विनंती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!