प्रतिनिधी,

पुण्यात संतोष माने प्रकरणाची पुर्नरावृत्ती झाल्याचे चित्र पुन्हा पाहायला मिळाले आहे. पुण्यातील पीएमटी बस चालकाने मद्यधुंद अवस्थेत असताना बस चालवली, एवढेत नव्हे तर बस चालकाने रिव्हर्स गिअरमध्ये बस चालवली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. बसमध्ये प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेत वाहन रिव्हर्स गियरमध्ये चालवून इतर वाहनांना देखील धडक दिली आहे. पुण्यातील वेताळ बाबा चौकात ही घटना घडली. नीलेश सावंत असे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाचे नाव आहे.

बस मध्ये 50 लोक प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी ट्वीटरवर या घटनेची बातमी शेअर केली आहे. महापालिका आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पोलिसांनी या चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याकडे विचारपूस करण्यात आली आहे. ते हा गुन्हा का केला याची चौकशी करण्यात आली आहे. या बस मधील प्रवाशांना कृष्णा जाधव नावाच्या मुलाने वाचवले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!