प्रतिनिधी,

इसम नामे निलेश जेधे व जीवन मागाडे यांनी सन २०२१ मध्ये वसंत राखा प्लाझा, फ्लॅट नंबर १०२, १०३, न-हे, पुणे येथे लीनक्स ट्रेड डॉट युके नावाचे क्रीप्टो करन्सीचे ऑफिस चालु करून त्यामध्ये क्रीप्टो करन्सीमध्ये रक्कम गुंतविल्यास जादा परतावा देण्याचे त्याचप्रमाणे २०० दिवस रक्कम मुदत ठेव ठेवल्यास दुप्पट रक्कम मिळेल नंतर १०० दिवस मुदत ठेव ठेवल्यास दुप्पट रक्कम मिळणार अशाप्रकारे गुंतवणुकदारांना विविध प्रकारची आमिष दाखविल्याने त्यावर ठेवीदारांनी विश्वासाने लहान मोठ्या रक्कम गुंतविल्या असता ठेवीदारांना सुरवातीस छोट्या छोट्या रकमेचा मोबदला देवून त्यावर विश्वास बसल्याने ठेवीदारांनी गोठ मोठ्या रक्कम गुंतविल्यानंतर सदर रकमेचा अपहार केला म्हणुन सदरबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून इराम नागे निलेश जेधे व जीवन मागाडे यांचे विरुध्द सिंहगड रोड, पुणे येथे गुरन २७६ / २०२३ भादंवि कलम ४२०,४०६,३४, महाराष्ट्र ठेविदारांच्या वित्तीय संस्थेच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास गुन्हे शाखा युनिट १, पुणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शब्बीर सय्यद हे करीत आहेत.

दाखल गुन्ह्याचे तपासामध्ये गुन्हे शाखेकडील पोलीसांना निष्पन्न झालेले आरोपी नामे १) सागर दत्तात्रय गो-हे वय ३१ वर्ष रा. नेहा कन्स्ट्रक्शन प्लॉट नं १२ धनकवडी पुणे २) महेश लक्ष्मण भोसले वय ३४ वर्ष रा. दिवा सरोवर, फ्लॅट नं २०३, जी विंग, दुसरा मजला जांभुळवाडी पुणे. ३) ऋत्विक मोहन पांगारे वय २३ वर्ष रा. फ्लॅट नं. ३०५ गगन समृध्दी सोसायटी आंबेगाव पठार पुणे. यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे कडून अपहार झालेल्या रकमेतून खरेदी केलेला कि रू १४,०८,६००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस यातील प्रमुख आरोपी निलेश जेधे व जीवन मागाडे यांचा शोध घेत आहे.

दाखल गुन्ह्याचे तपासामध्ये अद्याप पर्यंत फिर्यादी व साक्षीदार यांचे ५ कोटी पेक्षा जास्त रकमेचा अपहार झाल्याचे समोर आले असून नागरीकाना विनती करण्यात येत आहे की ज्या नागरीकानी क्रीप्टो करन्सी किंवा इतर मुदत ठेवींसाठी लीनक्स ट्रेड डॉट युके या कंपनीमध्ये रक्कम गुंतविल्या आहेत त्यांनी तक्रार देण्यासाठी गुन्हे शाखा युनिट १, पुणे शहर या कार्यालयात संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!