प्रतिनिधी,

पुणे:शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींची तसेच कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता शाळा सुरू ठेवत विद्यार्थ्यांना अनधिकृतरीत्या प्रवेश देऊन पालकांकडून भरमसाठ शुल्क वसूल करून शासन, पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी नऱ्हे येथील प्रसिद्ध आर्यन पब्लिक स्कूल (Aryan Public School) या शाळेच्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापिकेविरोधात सिंहगड रोड पोलीस (Sinhagad Road Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १६ जून २०२२ ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधी दरम्यान नऱ्हे येथील आर्यन पब्लिक स्कूलमध्ये घडला.

याप्रकरणी अशोक श्रीरंग गोडसे (50 रा. मगरपट्टा, हडपसर) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आर्यन पब्लिक स्कूलचे संस्थाचालक आर्यन सूर्यवंशी उर्फ संतोष चौरे व मुख्याध्यापिका आणि इतरांवर फसवणुकीसह अन्य प्रकरणांत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 16 जून 2022 ते 11 ऑक्‍टोबर 2023 दरम्यान घडला आहे. तक्रारीनुसार शाळा अनधिकृत असूनही अधिकृत असल्याचे दाखवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे दाखले व इतर कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. तसेच शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केली आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक यादव करत आहेत.

शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींची तसेच कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता शाळा सुरू ठेवत विद्यार्थ्यांना अनधिकृतरीत्या प्रवेश देऊन पालकांकडून भरमसाठ शुल्क वसूल करून शासन, पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक (Fraud) केल्याप्रकरणी नऱ्हे येथील प्रसिद्ध आर्यन पब्लिक स्कूल (Aryan Public School) या शाळेच्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापिकेविरोधात सिंहगड रोड पोलीस (Sinhagad Road Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १६ जून २०२२ ते ११ ऑक्टोबर २०२३ या कालावधी दरम्यान नऱ्हे येथील आर्यन पब्लिक स्कूलमध्ये घडला.

याप्रकरणी अशोक श्रीरंग गोडसे (50 रा. मगरपट्टा, हडपसर) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आर्यन पब्लिक स्कूलचे संस्थाचालक आर्यन सूर्यवंशी उर्फ संतोष चौरे व मुख्याध्यापिका आणि इतरांवर फसवणुकीसह अन्य प्रकरणांत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 16 जून 2022 ते 11 ऑक्‍टोबर 2023 दरम्यान घडला आहे. तक्रारीनुसार शाळा अनधिकृत असूनही अधिकृत असल्याचे दाखवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे दाखले व इतर कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. तसेच शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केली आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक यादव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!