प्रतिनिधी,

यातील तक्रारदार यांनी त्यांचे वडारवाडी पुणे येथे चालू असलेले इंटरनेटची एरीयल फायबर टाकण्याचे काम रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम १) निखील शिवा कांबळे २) अतुल अनिल धोत्रे यांनी जबरदस्तीने थांबवुन तुम्ही आमची परवानगी घेतली का बडारवाडी, पांडवनगर भागात आमच्या परवानगी शिवाय कोणी केवलचे काम करत नाही असे म्हणून तक्रारदार यांना जर तुम्हाला काम करायचे असल्यास आम्हाला दर महिन्याला १०,०००/- रुपये दयावे लागतील असे म्हणुन खंडणी मागत असलेबाबत तक्रारदार यानी दि.२३/१०/२०२३ रोजी तक्रारी अर्ज दिला होता. सदर तक्रारीची खात्री करून कारवाई करणेबाबत

पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा पुणे शहर यांना आदेशीत केले होते.

नमुद तक्रारीची खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखा पुणे शहरचे प्रभारी अधिकारी यांनी गत्काळ दखल घेतली. दि.२५/१०/२०२३ रोजी निखील कांबळे याने तक्रारदार यांना पैसे घेवून हॉटेल रेड पान्डा चायनिज, दिप बंगला चौक, शिवाजीनगर, पुणे येथे बोलविल्याने पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर यांनी पथक तयार करून सापळा कारवाई करून आरोपी नामे १) निखील शिवा कांबळे, वय-१९ वर्ष, रा. मरगम्मा देवी मंदिरा समोर, पांडवनगर, पुणे २) अतुल अनिल धोत्रे, वय-२१ वर्ष, रा. जुनी वडारवाडी, कुसाळकर बिल्डिंग, पुणे ३) तेजस शिवाजी विटकर वय २१ वर्ष, रा. ब्लॉक नं.३०, भाभा हॉस्पिटलचे मागे, वडारवाडी पुणे यांना घटनास्थळी तडजोडीअंती तक्रारदार यांचेकडुन ४,०००/- रुपये खंडणीची रक्कम स्विकारले असताना त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध तक्रारदार यांनी दिले फिर्यादीवरुन चतुःश्रृंगी पो.स्टे. गुन्हा रजि. नं. ७५६ / २०२३ भा.दं.वि. कलम ३८४,३८५.३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन दाखल गुन्हा त्यांना अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे), श्री. अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २. श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर, पोलीस उप-निरीक्षक श्रीकांत चव्हाण मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार, विजय गुरव, प्रदिप शितोळे, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे राहुल उत्तरकर सदोबा भोजराव, शंकर सपते, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, किशोर बर्गे, आशा कोळेकर यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!