प्रतिनिधी,

पुणे – वडगावशेरी सैनिकवाडी येथे आठ ते दहा अज्ञात हल्लेखोरांनी एका सराईताचा निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत अभिषेक दत्तू राठोड (वय 22, रा. मते नगर, वडगाव शेरी ) याचा हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने खून केला.खुनाचा गंभीर गुन्हा करून हल्लेखोर फरार झाले. घटनेची माहिती मिळतच घटनास्थळी येरवडा व चंदननगर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अभिषेक हा चंदन नगर पोलीस स्टेशनच्या पूर्व रेकॉर्डवरील आरोपी होता. त्याच्यावर खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे तसेच शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. घटनास्थळी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक कांचन जाधव यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. घटनास्थळावरून दोन दुचाकी तसेच एक तीक्ष्ण हत्यार पोलिसांनी हस्तगत केले असून तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. सैनिक वाडी येथे घडलेल्या निर्घुण खुनामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. मयत राठोड याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आला असून खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम येरवडा पोलीस स्टेशन येथे सुरू आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!