संपादक: शहानवाज मुलाणी

मागील आठवड्यातील हा तिसरा प्रकार आहे, जेव्हा रिक्षामध्ये प्रवास करत असताना प्रवाशाचे राहिलेले मौल्यवान चीज वस्तू रिक्षा चालकाने प्रामाणिकपणे संघटनेच्या माध्यमातून प्रवाशास परत दिला.

 

रिक्षा चालक अभिजीत पुराणिक यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शफिक भाई पटेल यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे साहेब यांना कळविले पोलीस उपायुक्त श्री. विक्रांत देशमुख साहेब यांच्या हस्ते सदर महागडा मोबाईल प्रवासी महेश गुंड व त्यांच्या पत्नी एडवोकेट सोनाली महेश गुंड यांना परत देण्यात आले.

यावेळी बोलताना आझाद रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शफिक भाई पटेल म्हणाले की कोणत्याही वाहनांमध्ये प्रवास करताना आपली एखादी मौल्यवान वस्तू ही त्या वाहनांमध्ये आपण विसरलो तर नाही ना याची खात्री करणे व सदर वस्तू आपल्या ताब्यात घेणे ही स्वतः प्रवाशाची जबाबदारी आहे, परंतु यामध्ये कदाचित रिक्षा चालकाची बदनामी होऊ शकते. यासाठी प्रवाशांनी थोडीशी काळजी घेणे गरजेचे आहे. पोलीस उपायुक्त श्री. विक्रांत देशमुख साहेब यांनी रिक्षा चालक अभिजीत पुराणिक यांचे मनापासून कौतुक केले व त्यांच्या प्रामाणिकपणासाठी त्यांच्या पाठीवर थाप मारली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!