प्रतिनिधी

पुणे शहरामध्ये एक असा प्रकार समोर आला आहे की पुणे ते अहमदनगर या मार्गावर चालणारी लक्झरी वाहन पकडण्यात आलेले असून संबंधित वाहनाचा नंबर GJ 14 X 4600 असून या याच नंबरची दुसरी गाडी ही गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्र मधील अहमदनगर जिल्ह्यामध्ये ओमकार ट्रॅव्हल्स सर्विस चे मालक आरिस बागवान हे आहेत. संबंधित गाडी ही जी महाराष्ट्रामध्ये चालत आहे ही गाडी चोरीची आहे का? कारण ह्याच नंबरची दुसरी गाडी ही गुजरात मध्ये चालत आहे जर ही गाडी चोरीची असेल तर अजूनही प्रशासन शांत का? आणि या ट्रॅव्हल्स सर्विस चे सर्व काम करणारे एजंट शकील हे प्रशासनाला हप्ता देऊन अनाधिकृतपणे आपली पोळी भाजत आहेत का? जर प्रशासन हप्ता घेत असेल तर प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे का? अशा प्रकारे वाहन चालवणे व प्रशासनाला फसवणे हे कितपत योग्य आहे?

अशी प्रशासनाची फसवणूक करत नागरिकांचा जीव धोक्यात आणण्याचे काम हे लक्झरी चालक व मालक करत आहेत का? सदर वाहन हे पुणे आरटीओ मध्ये असून तेथील असणाऱ्या नागरिकांमध्ये अशी देखील चर्चा आहे की “फक्त थोडा वेळ थांबावे लागेल कारण आपण त्यांना पैसे दिलेले आहेत थोड्या वेळातच गाडी सुटेल” जर अशी चर्चा येथील नागरिकांमध्ये असेल तर खरंच प्रशासनामधील कर्मचारी हे भ्रष्ट आहेत का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!