प्रतिनिधी,

एक जखमी इसम त्याचे ताब्यातील मोटार सायकल सह बावडी नं. ४ ते लोहगाव कच्चा रोड वरील बंद अवस्थेत पडलेल्या खदानी जवळ बेशुध्द अवस्थेत पडला असल्याची खबर वाघोली मार्शल यांना नियंत्रण कक्ष, पुणे शहर येथुन प्राप्त झाल्याने सदर प्राप्त खबरीचे अनुशंगाने सदर ठिकाणी रवाना होवुन चौकशी करून नयत इसमाचे अंगावर ठिकठिकाणी जखमा आढळुन आल्याने त्याच शवविच्छेदन ससून हॉस्पीटल, पुणे या ठिकाणी करण्यात आले. तसे लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर, अकस्मात मयत रजि. नं. २५७/२०२३ सी आर पी सी कलम १७४ प्रमाणे मयत दाखल करण्यात आले आहे..

सदर दाखल मयताचे अनुशंगाने घटनास्थळाची निरखुन पाहणी केली असता, घटनास्थळी मयत इसम पडलेल्या सदर ठिकाणी एक चष्मा, व मोटार सायकल हे संशयीत रित्या मिळुन आले. तसेच सदर मयत इसमाविरुध्द विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे मिसींग दाखल आहे. सदरचा प्रकार हा घातपाताचा असल्याची शक्यता बळावल्याने प्रभारी पोलीस निरीक्षक (गुन्हे), मारुती पाटील व सपोनि. सुरज राजगुरु यांनी घटनास्थळी भेट देवून प्रभारी पोलीस निरीक्षक (गुन्हे). नारुती पाटील यांनी सदर अकस्मात मयताबाबत सखोल चौकशी करणे बाबत योग्य त्या सुचना दिल्या होत्या..

चौकशी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, सुरज राजगुरु यांनी अकस्मात मयताचे अनुशंगाने लोहगाव परीसरात मयत इराम राहत असलेल्या ठिकाणी जावुन चौकशी केली असता दिनांक २९/१०/२०२३ रोजी मयत इसमाविरुद्ध विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे मनुष्य मिसींग दाखल असले बाबत माहीती प्राप्त झाली. तसेच मयत इसम ज्या ठिकाणावरुन मिसींग झाला आहे, त्या ठिकाणी गोडाऊन भाड्याने घेतलेला इराम नागेश नाईक व त्याचे चार कामगार अचानक काम सोडुन गेले बादल माहीती प्राप्त झाली. सदर प्राप्त नाहीतीचे अनुशंगाने सदर इसमाचे तांत्रिक विश्लेषणाव्दारे तपास केला असता दिनांक २८/१०/२०२३ रोजी मयत इसम व नागेश नाईक व इतर इसमांचे पठारे वस्ती, लोहगाव, पुणे या एकाच ठिकाणी कॉलींग झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच घटनास्थळावरुन काही पुरावे प्राप्त केले असता. खदाणा मध्ये मिळुन आलेल्या इसमाचा खुन झाल्याचा संशय अधिक बळावला.

सदरची चौकशी चालू असताना पोलीस अमलदार स्वप्नील जाधव यांना त्यांचे सच-याने दिलेल्या माहीती वरुन संशयीत इसम नामे लक्ष्मण नारायण इमनेलु वय ३८ वर्षे, रा. पाटोदा खुर्द, पोस्ट मंगना ली ता. धर्माबाद जि. नांदेड यास दिनांक ०३/११/२०२३ रोजी लोहगाव पुणे येथून ताब्यात घेवून त्याचेकडे सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस अंमलदार जाधव फरांदे व चिनके असे मिळून संशयीत इसमाकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता, मयत इसमास त्याचा साथीदार नागेश नाईक व त्याचे अन्य चार साथीदार यांनी सर्वांनी मिळून गोडाऊनचे भाडे देण्याचे कारण सांगुन पठारे वस्ती, लोहगाव पुणे या ठिकाणी नागेश नाईक याचे फरसाण चे गोडाऊन वर बोलावून मयत इसमास लोखंडी पाईपने गंभीर मारहाण करुन, त्याचा खुन करुन, त्याचे प्रेत छोटा हत्ती टेम्पोमध्ये टाकुन, वाघोली पुणे या ठिकाणी असणारे बंद पडलेल्या खाणी मध्ये टाकुन मयताची विल्हेवाट लावल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आला.

सदरचे तपासावरुन सपोनि सुरज राजगुरु, लोणीकंद पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी फिर्याद दिल्याने ००/२०२५ नंबरने गुन्हा दाखल होवून सदरचा गुन्हयाची कागदपत्रे व ताब्यात घेतलेला इसम यास विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडल ४ पुणे शहर श्री. शशिकांत बोराटे, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे. श्री. संजय पाटील याच मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे), मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सिमा ढाकणे, सपोनि सुरज राजगुरु, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस अमलदार संदीप तिकाणे, स्वप्निल जाधव, अजित फरांदे, कैलास साळुंके व शुभम चिनके, परमेश्वर आघाव, अशिष लोहार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!