प्रतिनिधी,

पुणे शहरातील महाराष्ट्र राज्यातील व इतर राज्यातील लोकांना सीकींग अॅडव्हेंचर या डेटींग अॅपद्वारे आकर्षीत करून व चॅटींग करून त्यांना मोबाईलवर मुलीचे फोटो पाठवुन हॉटेल बुक करावयाला लावुन हॉटेल बुक केल्यावर ग्राहकाकडून ठरलेली रक्कम ऑनलाईन घेवुन तसेच ग्राहकांना दमदाटी गारहाण करून जबरदस्तीने आणखी जास्तीची रक्कम ऑनलाईनद्वारे घेवुन तसेच ग्राहकाकडील मौल्यवान चिज वस्तु, सोन्याचे दागिने जबरदस्तीने जबरी चोरी करून लुटुन नेणारे अनोळखी एक पुरूष व अनोळखी एक महिला यांचे विरुध्द चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुरनं. ५०२/२०२३ भादवि ३९४,५०६.३४ व आयटी अॅक्ट ६६ अ.६६ व अन्वये दाखल असलेल्या गुन्हयाचा मा. वरीष्ठांचे आदेशाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष व सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा याचे मार्फत तपास चालू असताना अटक आरोपींनी याच प्रकारचे आणखी इतर खाली नमुद प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे..

१) विमानतळ पोलीस स्टेशन गुरनं ५५६ / २०२३ भादवि ३९४, ५०६, ३४ व आयटी अॅक्ट ६६ अ. ६६ ब

२) सिंहगड पोलीस स्टेशन गुरनं ५३५ / २०२३ –//— ३) हिंजवडी पोलीस स्टेशन गुरनं १२३९ / २०२३, –//–

४) पनवेल तालुका पोलीस स्टेशन गुरनं २७०/२०२३ —//—अटक आरोपी यानी इतर राज्यात हैद्राबाद बँगलोर राज्यात गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले

आहे.

सदर तपास चालू असलेला चंदननगर पोलीस स्टेशन येथे गुरनं. ५०२ / २०२३ या गुन्हयाचे तपासात जटक आरोपिंकडुन एकुण ५०६९.१४०/-रू (पन्नास लाख एकोणसत्तर हजार एकशे चाळीस रूपये ) चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे पुणे शहर श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ • पोलीस निरीक्षक श्री. भरत जाधव तसेच, अनिकेत पोटे, सपोनि राजेश माळेगावे, सपोका राजेंद्र कुमावत, पोलीस अंमलदार बाबा कर्पे मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे इरफान पठाण, सागर केकाण, इम्रान नदाफ, अमेय रसाळ, किशोर भुजबळ, सदीप कोळगे या पथकाने यशस्वी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!