सोलापूर: प्रतिनिधी,

बोगस गिऱ्हाईक पाठवून गोपनीय माहितीची खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी साडेसहा वाजता अचानक छापा टाकला अन् सोलापूर विमानतळ पाठीमागील नागनाथ नगरातील घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकला. या छाप्यात दाेन पिडितांची मुक्तता केली. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने केली.

या कारवाईची माहिती शहर पोलिसांनी रविवारी सकाळी पत्रकारांना दिली. उषा बापू बनसोडे (वय २४) व राहुल खाजप्पा अण्णारेड्डी (वय २५, रा. कोंचीकरवी गल्ली, सोलापूर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, विमानतळाच्या पाठीमागे असलेल्या नागनाथ नगरात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बोगस गिर्हाईक पाठवून खात्री करून अचानक छापा टाकला. या छाप्यात एक महिला एजंटासोबत दोन पिडित महिलांची पिळवणूक करून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेवून त्याच्या येणाऱ्या कमाईवर उपजिविका चालविणाऱ्या दोघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पेालिस निरीक्षक महादेव राऊत हे करीत आहेत. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलिस निरीक्षक महादेव राऊत, महिला पोलिस उपनिरीक्षक नशिपून शेख, सहाय्यक फौजदार राजेंद्र बंडगर, हेमंत मंठाळकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल महादेव बंडगर, पोलिस नाईक अ. सत्तार पटेल, मपोहकॉ मुजावर, अकिला नदाफ, मपोना वैशाली बांबळे, चालक पोकॉ स्वप्नील मोरे यांनी छापा यशस्वी केला

एमआयडीसी पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर शासकीय रूग्णालयात तपासणी करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पोलिस तपासाच्या अनुषंगाने संबंधितांना २० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!