नाशिक: प्रतिनिधी

मावळते पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली झाल्याने पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात ते भावुक झाल्याचे दिसून आले. यावेळी उपस्थित पोलीस उपायुक्तसह पोलीस अधिकाऱ्यांनी भावना व्यक्त करीत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पोलीस मुख्यालयातील भीष्मराज बाम सभागृहात मावळते पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकारयांनी आयुक्त शिंदे यांच्या 11 महिन्यातील कार्यकाळात केलेल्या कामाचा आणि आयुक्तांचे त्यावेळी मिळालेले मार्गदर्शन मोलाचे असल्याचे म्हणाले.आयुक्त शिंदे हे बोलन्यास उभे राहिले असता, ते पाहिल्याच शब्दाला भावुक झाले. त्यांचा कंठ दाटून आला. त्यामुळे काही क्षण ते बोलू शकले नाही. पाणी घेतल्यानंतर पुन्हा त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना आपला भावना रोखताना ते पुन्हा भावुक झाले. यामुळे सभागृआतील वातावरणही भावनिक झाले. काही वेळाने आयुक्त शिंदे यांनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली आणि पोलीस दलात काम करताना त्याग आणि तत्वांना सांभाळत काम केलयाचा अभिमान व्यक्त केला

तत्पूर्वी, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी यांच्यासह सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षकांनी मनोगत व्यक्त करीत आयुक्त शिंदे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.चार दिवसांपूर्वी आयुक्त शिंदे यांची राज्यगुप्त वार्ता विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!