प्रतिनिधी,

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे दैनंदिन कर्तव्य करीत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर, निलेश ढमढेरे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आंबेगाव बु,जांभुळवाडी तलाव येथे एक इसम गावठी कट्टा घेवुन थांबला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपारा पथकाचे अधिकारी व अंगलदार यांनी जांभुळवाडी तलाव येथे जावुन बातमीप्रमाणे इसमाचा शोध घेतला असता तेथे मामा पान शॉप पुढील पुलावर बातमीप्रमाणे इसम नामे योगेश हनुमंत मालुसरे, वय ४१ वर्षे, रा. सध्या फ्लॅट नंबर ४०१, ओम हाईटस, सिध्दीविनायक सोसायटी, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे हा त्याचे ताब्यात एक ४०,०००/- रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व ४००/- रुपये किंमतीचे २ जिवंत काडतुस असा एकुण ४०,४००/- रुपयांचे मुद्देमालासह मिळुन आल्याने ते जप्त करण्यात आले असुन आरोपी विरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७६५/२०२३, भारतीय हत्याराचा अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ हे करीत आहे.

सदरची कामगिरी मा अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. पुणे शहर श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विदयापीठ पोलीस स्टेशन श्री विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक चिरज गुप्ता, पोलीस अंमलदार निलेश ढमढेरे, महेश बारवकर, सचिन सरपाले, मितेश चोरगोले, शैलेश साठे, चेतन गोरे, मंगेश पवार, निलेश जमदाडे, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!