संपादक: शहानवाज मुलाणी

पुणे-अहमदनगर रस्त्यावर वडगाव शेरी चौकाजवळ इथिलीन ऑक्साईड वाहून नेणारा टँकर उलटल्याची घटना घडली आहे. या टँकरमधून इथिलीन ऑक्साईड वायूची वाहतूक केली जात होती.

पुण्याच्या विमान नगर परिसरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. टँकर पलटल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात वायू गळती होत होती. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो लोकवस्तीचा परिसर आहे. त्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली होती.

घटनेची माहिती मिळताच पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकूण 8 फायर इंजिन तैनात करण्यात आले होते. वायूगळतीमुळे आग लगाण्याचा आणि स्फोटाची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनीचे बचाव व दुरुस्ती पथक येईपर्यंत टँकरवर सतत पाण्याची फवारणी होती. पोलिस विभागाने वाहतुकीचे नियमन केले आहे. या घटनेमुळे या मार्गावरून जाणारी वाहतुक मंदावली होती.

प्राथमिका माहितीनुसार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा टँकर पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून टँकरवर सतत स्प्रे मारणे सुरू आहे. अपघातानंतर पोलिसांनी (Police) हा रस्ता तात्पुरता बंद केला होता.आणि पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली होती. या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी अजून दोन ते तीन तासांचा वेळ लागणार असल्याचे सांगितले जात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!