संपादक शहानवाज मुलाणी

पुण्यातील प्रसिद्ध रुबी हॉस्पिटलमधील महिला कामगार आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. रुबी हॉलचा एचआर मॅनेजर प्रभाकर श्रीवास्तव यांच्यासह २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. रुबी हॉस्पिटलमधील मिताली आचार्य या नर्सने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी हॉस्पिटलमधील मॅनेजरसह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

रुबी हॉस्पिटलच्या अंजली केळकर, नीलम हिरे यांच्यासह एचआर मॅनेजर प्रभाकर श्रीवास्तव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मिताली आचार्य यांना मानसिक त्रास देऊन त्यांच्या अपमान करत या तिघांनी त्यांचं शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपासून आंदोलन केले होते. त्यानंतर आता पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिसांमध्ये रुबी हॉस्पिटलच्या मॅनेजरवर गुन्हा दाखल झाल्याने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

रुबी हॉस्पिटलमधील १५ जणांवर गुन्हा

गेल्या वर्षी देखील रुबी हॉस्पिटल हे चांगलेच चर्चेत आले होते. कोरेगाव पार्क पोलिसांनी पुण्याहून किडनीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. त्यावेळी पोलिसांनी रुग्णालयातील १५ जणांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले होते. रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर ग्रँड परवेज यांच्याबरोबरच अन्य व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. कागदपत्रांची खात्री न करता दिशाभूल करून, किडनी बदलली गेल्याचे समोर आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!