संपादक:शहानवाज मुलाणी

पुणे : विद्येच माहेरघर आसणाऱ्या पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. तरूणाई मोठ्या प्रमाणावर व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहे. अशा गोष्टींनी रोखण्यासाठी पोलीस, प्रशासनही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे.

अशातच पुणे शहर परिसरात मध्यरात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात पार्टी सुरू असणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे.

नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात साऊंड लावल्याप्रकरणी पुण्यातील तब्बल 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात तसेच उपनगरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे.

रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, मद्य परवानाचे रजिस्टर न भरणे आणि विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पुण्यातील तब्बल १० नामांकित हॉटेल्सवर आणि पब्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मागील आठ दिवसात पुण्यातील 10 हॉटेल्स आणि पबवर ही कारवाई करण्यात आलेली आहे.

कोणत्या हॉटेल्सवर कारवाई?

प्लंज, कोरेगाव पार्क

लोकल गॅस्ट्रो बार

एलरो

युनिकॉर्न

आर्यन बार, बालेवाडी

नारंग वेंचर

हॉटेल मेट्रो

लेमन ग्रास, विमाननगर

बॉलर

हॉटेल काकाज

कोरेगाव पार्क, मुंढवा, बंडगार्डन, बाणेर, हिंजेवाडी, बालेवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात पब आहेत. तरूणाईला आकर्षित करण्यासाठी पबमध्ये अनेक सवलती दिल्या जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!