दिनांक २५/०७/२०२३ रोजी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर रूम / शॉप नंबर ०४, तळमजला, प्लॉट नंबर ४२९, हाजी ईस्माईल बिल्डिंग, नूर मोहम्मद बेग मोहम्मद बिल्डिंग, व्ही पी. रोड, अँड रोड, मुंबई, येथे एक पंच व एक बनावट ग्राहक यांना पाठवून बातमीची खात्री केली. मिळालेल्या बातमी मध्ये सत्यता आढळल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाने छापा टाकुन कारवाई करण्यात आली.

 

घटनास्थळी मिळून आलेल्या पीडितांकडे चौकशी केली असता त्यांनी सदर ठिकाणी बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेत असले बाबत माहिती दिली. तसेच सदर पीडितांना मिळणाऱ्या रकमेपैकी काही रक्कम कुंटणखाना चालक- मालक, दलाल हे घेत असल्या बाबत त्यांनी माहिती दिली. तसेच बळीत बांगलादेशी महिलेस भारतात आणून तिला दीड लाख रुपयात विकत घेऊन तिला कोंडून ठेवून मारहाण करून तिचे कडून जबरदस्ती वेश्या व्यवसाय करून घेत असल्याबाबत माहिती दिली.

 

सदर ठिकाणी सदर आरोपी हे बेकायदेशिरपणे देह विक्रीचा व्यवसाय करण्याकरीता महिलांना देह विक्रीस प्रवृत्त करून ग्राहकांकडून महिलांना मिळणाऱ्या रकमेतून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतो असे निदर्शनास आल्यावरून नमुद आरोपींना ताब्यात घेवून व बळीत महिलांना ताब्यात घेतलेल्या मुद्देमालासह पुढील कायदेशिर कारवाईकरीता डी.बी मार्ग पोलीस ठाणे गु.न.क्र. १९३ / २३ कलम ३२३, ३४२, ३४४, ३४६, ३७०, ३७०, ३७२, ५०६ ३४ भा.द.वि सह कलम ३,४,५,६,७(१)(ब) अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी इसमास अटक केली.

 

नमुद कारवाई दरम्यान १ मॅनेजर, २ दलाल यांना अटक करण्यात आलेली आहे तसेच ७ बळीत महिलांना ताब्यात घेतले असून त्यांचेबाबत पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

 

सदरची यशस्वी कारवाई मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. विवेक फणसळकर, मा. विशेष पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शशी कुमार मीना, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण- १) गुन्हे शाखा, श्री. राज तिलक रौशन, मा. पोलीस उप आयुक्त, अंमलबजावणी, गुन्हे शाखा, श्री. डी. एस. स्वामी, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डि-पश्चिम) गुन्हे शाखा, श्री. महेश देसाई, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमलबजावणी कक्षाचे श्री. चंद्रकांत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाईमध्ये प्र.पो. नि. लक्ष्मीकांत साळुंखे, स.पो.नि. मनोजकुमार प्रजापती, पो.ह. क्र. ००१०९/ किणी, पो.ना. क्र. ०३६०५ / कुरकूटे, म.पो.शि.क्र.०९१८०१ /गायकवाड तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पोलीस निरीक्षक अनिता कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब कानवडे, पोउनि योगेश कन्हेरकर, म.स.फौ. साठे, म.पो.ह. क्र. २००१६६/ हळकर, पो.ह. क्र. ३२१७६ /चौधरी, पो.शि.क्र. ०८०९५२/पाटसुपे, पो.शि.क्र. ०९३६९१/ घुगे, पो.शि.क्र. ०९०३९७ /यादव, पो.शि.क्र.०९१५७३/ घाडी, पो.शि.क्र. ०९२०९२/शिंदे, म.पो.शि.क्र. ०७०६३७/पाटील, म.पो.शि. क्र.०८०९४८ / जगताप यांनी पार पाडली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!