संपादक: शहानवाज मुलाणी

पुणे – मटणाची उधारी तीही तब्बल ६१ लाख रुपये… मटण विक्रेत्याला उधारीची ही रक्कम परत करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी लष्कर पोलिसांनी शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मटण विक्रेत्याने (वय ४३, रा. स्ट्रीट कॅम्प) लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी हॉटेलचालक अफझल युसूफ बागवान (वय ६५, रा. कोंढवा) आणि अहतेशाम अयाज बागवान (वय ३५) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर परिसरातील मटण मार्केटमधून या हॉटेलला दररोज मटण, चाप, खिमा, गुर्दा याचा पुरवठा केला जात होता. विक्रेत्याने या हॉटेलला २०१९ ते २०२३ या कालावधीत दोन कोटी ९१ लाख ८१ हजार रुपयांचा मटण पुरवठा केला.

हॉटेलचालकाने एकूण उधारीपैकी दोन कोटी ३० लाख १९ हजार रुपये परत केले. परंतु उर्वरित रक्कम ६१ लाख ६२ हजार रुपये देण्यास हॉटेलचालक टाळाटाळ करीत होता. त्यामुळे मटण विक्रेत्याने लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी हॉटेलचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!