प्रतिनिधी.

– मंत्री उदय सामंत

 

मुंबई, दि. 26 : पुणे महानगरपालिकेतील वाघोली गावातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा या मूलभूत सोयीसुविधा व विकासकामाबाबत लवकरच आढावा बैठक घेणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

 

सदस्य अशोक पवार यांनी पुणे महानगरपालिकेतील वाघोली गावातील मूलभूत सोयीसुविधा संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. सामंत यांनी उत्तर दिले.

 

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या लोहगाव वाघोली या गावांकरिता सन 2023 ची लोकसंख्या विचारात घेता  56 एम. एल. डी. क्षमतेची समान पाणीपुरवठा योजना पुणे महानगरपालिका मार्फत हाती घेण्यात आली आहे. या योजनेतून 31 एम. एल. डी. पाणी वाघोलीकरता उपलब्ध होईल.

 

वाघोलीतील अस्तित्वातील पाच एम. एल. डी. पाणीपुरवठा योजना,  पीएमआरडीएमार्फत प्रगतीत असलेली 5 एम. एल. डी. पाणीपुरवठा योजना, पीएमआरडीएमार्फत प्रगतीत असलेली 5 एम एल डी. पाणीपुरवठा योजना व पुणे मनपामार्फत हाती घेतलेल्या समान पाणीपुरवठा योजनेतून वाघोलीकरिता उपलब्ध होणारे 31 एम. एल. डी.  पाणी असे सन 2025 पर्यंत एकूण 41 एल. डी.  पाणी वाघोलीकरिता उपलब्ध होईल.

 

सदस्य  यांनी राहुल कुल, भीमराव तपकीर यांनी यावेळी चर्चेत सहभाग घेतला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!