नाशिक, प्रतिनिधी

चांदवडवरून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने एक स्फोटकांनी भरलेला ट्रक जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसानी तो ट्रक जप्त केला.

चांदवड येथे चांदवड-मनमाड राज्य महामार्गावर अवैधरित्या स्फोटके घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला आहे. जिलेटिनच्या कांड्यांची  वाहतूक करणारा एक ट्रक छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असल्याची पोलिसांना  माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या ट्रकमधून एकूण 7 लाख 94 हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!