संपादक: शहानवाज मुलाणी

गोव्यात येत्या 8 ते 13 जानेवारी 2024 या कालावधीत आयोजित करण्‍यात आलेल्या ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट गोवा’च्या पार्श्‍वभूमीवर काल, 01 जानेवारी, लेखा संचालनालय, पोर्वोरिम येथे गोव्याच्या स्वयंपूर्ण मित्रांसाठी एका विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या क्षमता आणि कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ म्हणून तयार केलेल्या या फेस्टचे महत्त्व स्वयंपूर्ण मित्रांना सांगणे, हा या बैठकीचा प्राथमिक उद्देश होता.

 

या आंतरराष्‍ट्रीय पर्पल फेस्टमध्‍ये दिव्यांगांसाठी तयार केलेल्या विविध सत्रांचे आयोजन करणे, त्यांच्यापुढील आव्हाने प्रभावीपणे हाताळण्यासाठी मार्गदर्शन करणे हे उद्दिष्ट आहे. शिवाय, दिव्यांग व्यक्तींच्या पालकांसाठी विशेष सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे, आपल्या विशेष पाल्याची काळजी कशी घ्यावी, याचे अमूल्य मार्गदर्शन यावेळी देण्‍यात आले.

या मेळाव्याला मार्गदर्शन करताना, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण मित्रांना त्यांच्या समुदायामध्ये सक्रीयपणे सहभागी होण्यासाठी, दिव्यांग व्यक्तींची ओळख करून देण्यासाठी आणि त्यांना यूडीआयडी कार्ड मिळविण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.या कार्डच्या महत्त्वावर जोर देऊन, त्यांनी दिव्यांग समुदायाला पाठिंबा देण्यासाठी गोवा सरकार वचनबद्ध आहे, हे अधोरेखित करून दिव्यांगांना आवश्यक उपकरणे उपलब्ध करून देण्याची त्याची भूमिका आपली आहे, असे सांगितले. फेस्टच्या गतवर्षी मिळालेल्या यशाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “गेल्या वर्षीच्या पर्पल फेस्टचा प्रतिध्‍वनी केवळ गोव्यातच नव्हे तर संपूर्ण देशात उमटला.”

सहभागींच्या स्तुत्य प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना, समाजकल्याण मंत्री सुभाष फल देसाई यांनी दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात क्रांतिकारक पाऊल उचलणारी चळवळ म्हणून फेस्टचे महत्त्व अधोरेखित केले. “हा कार्यक्रम विविध सरकारी योजनांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी, विविध सुविधा आणि उपलब्ध सहाय्य, सेवांबद्दल लोकांमध्‍ये प्रबोधन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम करत आहे,” असे ते म्हणाले.

गोवा राज्याचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी, एक अंतर्दृष्टीपूर्ण सादरीकरणासह बैठकीची सुरुवात केली, बहुप्रतीक्षित कार्यक्रमासाठी नियोजित केलेले अनेक उपक्रम आणि आकर्षणांचे अनावरण केले. या वर्षीच्या आवृत्तीमध्ये सहभागींसाठी अद्भूत आणि आनंददायक अनुभवाची ग्वाही देवून , सहली, सागरी पर्यटन, चित्रपट स्क्रीनिंग आणि आकर्षक खेळ आणि क्रियाकलाप यासारख्या रंजक कायर्क्रमांचे आयोजनन करण्‍यात येईल, अशी हमी दिली आहे.

गोवा सरकारच्या एडीआयपी योजनेबद्दल बोलताना (अपंग व्यक्तींना सहाय्य/उपकरणे खरेदी/फिटिंगसाठी सहाय्य), कर्टोरिमचे आमदार अलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को यांनी 40% दिव्यांग प्रमाणपत्र आणि 22,500 रूपये किमान मासिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना आवश्यक उपकरणे पुरविण्याची सरकारची बांधिलकी अधोरेखित केली. “हा उपक्रम लोकसंख्येच्या दृष्‍टीने महत्त्वपूर्ण भाग त्यामध्‍ये येत असल्याचे सुनिश्चित करतो, सर्वसमावेशकता आणि समर्थन वाढवतो,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला कोर्टालिमचे आमदार अँटोनियो वास आणि उत्तर गोव्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी कुमारी देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!