संपादक:शहानवाज मुलाणी

पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील पंधरा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या शुक्रवारी रात्री उशिरा बदल्या केल्या आहेत. बदल्या झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नावे आणि कुठून कोठे बदली झाले हे पुढील प्रमाणे – १) दत्तात्रय विश्वनाथ भापकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा) २) कांचन मोहन जाधव (पोलीस निरीक्षक (गुन्हे), येरवडा पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन) ३) विजय रघुनाथ पुराणिक (पोलीस निरीक्षक (गुन्हे) भारती विद्यापीठ, पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा) ४) अनिता रामचंद्र हिवरकर (पोलीस निरीक्षक (गुन्हे) फरासखाना पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथक -१) ५) सुनील गजानन थोपटे (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी पथक -१ ते नियंत्रण कक्ष) ६) संदीप देशमाने (पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलंकार पोलीस स्टेशन) ७) क्रांतीकुमार पाटील (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक ते गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक -१) ८)विनायक दौलतराव गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक- १) ९) दशरथ शिवाजी पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस स्टेशन ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक) १०) संतोष उत्तमराव पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन) ११) बाळकृष्ण सीताराम कदम (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन ते आर्थिक गुन्हे शाखा) १२) राजेश रामचंद्र तटकरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अलंकार पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक कोर्ट कंपनी) १३) महेश गुंडप्पा बोळकोटगी (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ५ ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंढवा पोलीस स्टेशन) १४) विष्णू नाथा ताम्हणे ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ५) १५) विजय गणपतराव कुंभार (पोलीस निरीक्षक, विशेष शाखा ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, अभियोग कक्ष) लष्कर आणि बंडगार्डन पोलीस स्टेशन येथील गुन्हे निरीक्षक (क्राईम पीआय) हे पुढील आदेश होईपर्यंत सदर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहतील. सर्वच पोलीस निरीक्षकांनी पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरित कार्यभाग स्वीकारून अनुपालन अहवाल पोलीस आयुक्त कार्यालयास तात्काळ सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!