प्रतिनिधी: संकेश यादव

पुणे- पुण्यात मेट्रोच्या ट्रॅकवर पडलेल्या तीन वर्षाच्या लहान मुलीसह तिच्या आईला प्रसंगावधान राखून वाचवणारे मेट्रोचे सुरक्षारक्षक विकास बांगर यांचा वडगाव शेरी काँग्रेस कमिटीच्या वतीने नुकताच विशेष सत्कार करण्यात आला. 19 जानेवारी रोजी सिविल कोर्ट पुणे मेट्रो स्टेशन येथेही धक्कादाय घटना घडली होती. मेट्रोचे सुरक्षारक्षक विकास बांगर यांनी प्रसंगावधान राखून वेळेवर समोरून येणाऱ्या मेट्रो ट्रेनला अलर्ट केले. त्यामुळे सुमारे 30 मीटर अंतरावरच असा येणारी मेट्रो जागेवरच थांबली त्यामुळे पुढील अनर्थ टळला. समाजातील “सिविल हिरो ” म्हणून त्यांच्या या कामगिरीचे वडगाव शेरी काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सचिन भोसले यांनी” सॅल्यूट”

करून सत्कार केला. मेट्रो सुरक्षारक्षक बांगर यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्याप्रमाणे इतर सुरक्षारक्षकांनी देखील जागरूकपणे काम करावे अशी अपेक्षा यावेळी सचिन भोसले यांनी व्यक्त केली. यावेळी नंदू राक्षे,विवेक भोसले, भारत देवकुळे,अमर पाटोळे,निलेश मकासरे,किरण खंडाळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!