प्रतिनिधी: पुणे

तक्रारदार वय २४ वर्षे रा. घोरपडी पुणे यांनी त्यांचे मालकीची हीरो होंडा मोटार सायकल ही मुंढवा हद्दीतील बीटी कवडे रोडवरील असलेल्या युनिवर्सल फिटनेस क्लब या जीम बाहेर पार्क करुन ठेवलेली होती सदरचे वाहन हे त्या ठिकाणावरुन अज्ञात इसमाने चोरुन नेले होते, त्याबाबत मुंढवा पोलीस ठाणेस गु.र. नं.४१/२०२४ मा.द.वी. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाचे तपासाबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुंढवा पोलीस ठाणेचे श्री. महेश बोळकोटगी यांनी तपास पथकास आदेश दिलेने गुंढवा तपास पथक सदर वाहनाचा व अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलिस अमंलदार हेमंत पेरणे यांना त्यांचे गोपनीय बातमिदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम चोरीची गाडी घेवुन बीटी कवडे ब्रीज खाली संशयित रीत्या थांबलेला आहे. लागलीच सदरची बातमीवरुन वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुंढवा पोलीस ठाणे यांनी कारवाईचे आदेश दिलेने तपास पथक अधिकारी सहा.पो.निरी. संदीप जोरे य स्टाफ यांनी सदर वाहनचालकास ताब्यात घेवुन त्याला वापरत असलेल्या गाडीबाबत विचारपुस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देवुन नंतर सदरची

गाडी फायदयाकरीता चोरल्याचे कबुल केले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इमरान सिकंदर शेख वय ३४ वर्षे रा. भाग्यश्री नगर घोरपडी पुणे असे आहे. आरोपीकडे अधिक तपास सुरु आहे,

सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, श्री रंजनकुमार शर्मा मा. उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री आर राजा, मा. सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अश्विनी राख, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे, श्री. महेश बोळकोटगी, तपास सहा. पोलीस निरीक्षक संदिप जोरे, पोलिस अर्गलदार संतोष काळे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, दिनेश राणे, महेश पाठक, राहुल मोरे, स्वप्नील रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!