प्रतिनिधी: संकेश यादव

पुणे.पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके आणि त्यांच्या पंटरना आयुक्तांलयात ‘परेड’ घेऊन दम दिल्यानंतरही आरोपींकडून रिल्स बनविण्याचे उद्योग सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. रिल्स न बनविण्याबाबत सज्जड दम दिल्यानंतर काही तासांतच इंन्स्टाग्राम या सोशल मीडियावर ‘पुणे शहर डॉन’ म्हणून नीलेश घायवळचा पोस्ट टाकण्यात आल्याने पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत गुंडगिरी सुरूच ठेवण्याचे संकेत यानिमित्त गुन्हेगारांनी दिल्याचे दिसत आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अमितेश कुमार अॅक्शन मोडवर आले आहेत. पहिल्याच आठवडय़ात गुन्हे शाखेने गुन्हेगारांची परेड घेऊन गुन्हेगारी कृत्यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी न होण्याचे आवाहन केले. यापुढील काळात शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडेल असे कोणतेही वर्तन करणार नाही. तसेच त्यामध्ये आपला सहभाग राहणार नाही, अशी हमी या गुन्हेगारांकडून घेऊन त्यांना समज देण्यात आली. त्यानंतर काही तासांतच गुंड नीलेश घायवळ याचे उदात्तीकरण करणारे हे रिल्स अपलोड केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!