प्रतिनिधी: संकेश यादव

पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागातील, आरोग्याचे मुलभूत प्रश्नांसाठी किसानसभा आणि पुणे जिल्हा समितीच्या वतीने आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते.

आरोग्य उप संचालकांच्या लेखी आश्वासनानंतर रात्री उशीरा स्थगित करण्यात आले.

आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली,आरोग्य प्रश्नांची सोडवणूक करणेसाठी झालेल्या बैठकीला, प्रशासनाच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ एम्पले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, उरो रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. होसमनी उपस्थित होते. याशिवाय किसान सभेच्या वतीने डॉ.अमोल वाघमारे, लक्ष्मण जोशी, अशोक जोशी, गणपत घोडे, कल्पना केंगलेआणि मारुती शिंदे आदी उपस्थित होते.

आश्वस्त केलेल्या मागण्या

– तळेघर ता. आंबेगाव येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी पद मंजुरी, साहित्य खरेदी प्रक्रिया सुरू करणे आणि इमारत ताब्यात घेणे.

– तीरपाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी नियुक्त करून आठ दिवसांत ते रुजू करणे.

– रुग्णसेवेतील हलगर्जीपणाबाबत दोषी कर्मचार्‍यांवर कारवाई करणे.

– आरोग्य केंद्रात नियमित आणि रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी हवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!