प्रतिनिधी

बारामती तालुक्यामधील निरावागज या गावातील श्री वाघेश्वर विद्यालय निरावागज या विद्यालयामधील सन 2005 सालाच्या विद्यार्थ्यांची खूप दिवसानंतर स्नेहसंमेलन सोहळा अति उत्साहात साजरा झाला यामध्ये आयोजक व नियोजक यांनी अति उत्तम प्रमाणे नियोजन करून लहानपण देगा देवा या म्हणीचे एक छोट्या स्वरूपामध्ये माजी विद्यार्थ्यांना आपले बालपण जगण्याचे व आपल्या बालपणीचे मित्रांबरोबर काहीसा वेळ घालवण्यासाठी खूप उत्तम पद्धतीने नियोजन केले

या सोहळ्यामध्ये खूप दिवसानंतर आपले बालपणीचे मित्र एकमेकांना भेटले व यामध्ये आपल्या आयुष्यामधील चढ-उतार एकमेकांना सांगून आपले मन हलके करून आपले पुढील आयुष्य जगण्यासाठी हे अविस्मरणीय क्षण आपल्या मनामध्ये जोपासून खूप जोमाने आपले आयुष्य जगतील कारण जुन्या आठवणी हे उत्साहातील अति नाजूक दोरा म्हणून ओळखला जातो आणि हा नाजूक दोरा टिकवून ठेवणे हे या विद्यार्थ्यांनी अतिशय महत्त्वाचे उदाहरण देऊन सांगितले आहे.

लहानपणीचे मित्र हे आपल्या जिवाभावासारखे असतात आपले लहानपण हे कसे गेले यांच्याबरोबर राहून कधी कळलेच नाही आयुष्य हे एवढे खडतर आहे हे यांच्याबरोबर कधी कळलेच नाही खडतर आयुष्य हे आपल्या लहानपणीच्या मित्रांबरोबर अतिशय सुखमयप्रमाणे जाते हे आज या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले

बालपणीच्या मित्रांवरती खूप सारे लिहिता येते बोलता येते परंतु लिहिता आणि बोलताना जुन्या आठवणी येतात परंतु आपले आयुष्यातील हे क्षण कधी परत येणार नाहीत हे लक्षात येतात मन भारावून जाते.

श्री वाघेश्वर विद्यालय निरावागज सन 2005 सालच्या विद्यार्थ्यांना आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!